भारतात ५जी लाँच झाल्यापासून कोणत्या मोबाईलमध्ये ५जी सेवा वापरता येतेय आणि कोणत्या नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. फोनमध्ये ५जी कनेक्शन सुरू करण्यापासून ते नवीन फोन घेताना त्यात ५जी सर्विस आहे की नाही हे तपासण्यापर्यंत सर्वजण ‘५जी’बाबत जागृक झाले आहेत. त्यातच आता एक नवा स्वस्त ५जी फोन लाँच झाला आहे. ज्याची किंमत फक्त १२ हजार रुपये आहे, कोणता आहे हा स्मार्ट फोन जाणून घ्या.
‘ऑनर प्ले ६सी’ हा ५जी स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, स्नैपड्रैगन ४ सिरीज लीप, सिंगल रिअर फेसिंग कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये आणखी काय फीचर्स आहेत जाणून घ्या.
आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
फीचर्स :
- ऑनर ६सी हा फोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- याचा बॅक कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे.
- हा फोन ‘अँड्रॉइड १२ ओएस’वर आधारित आहे.
- यामध्ये ५००० mAh पॉवर असणारी आणि २२.५ W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी बॅटरी देण्यात आली आहे.यामध्ये वायफाय, ब्लुतुथ, ड्युअल सिम, जीपीएस, युएसबी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.