Honor ने भारतात आपले नवेकोरे स्मार्टवॉच Honor Watch GS 3 लॉन्च केले आहे. Honor Watch GS3 हे स्मार्टवॉच वजनाने हलके आहे आणि 3D कर्व्ड ग्लास मिळतोय. यात १.४३ इंच स्क्रीन, १० हून अधिक प्रोफेशनल स्पोर्ट्स मोड आणि १०० हून अधिक इतर स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Honor Watch GS 3 हे वॉटरप्रूफ आहे आणि ते 5ATM रेटिंगसह येतं. डिव्हाईसमध्ये नवीन PPG सेन्सर मॉड्यूल आहे जे युजर्सच्या आरोग्य डेटाचा चांगल्या प्रकारे मागोवा घेण्यासाठी AI हार्ट रेट मॉनिटरिंग इंजनने सुसज्ज आहे. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतं आणि यामध्ये अनेक स्मार्ट कंट्रोल फंक्शन्स देण्यात आले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, Honor Watch GS3 स्मार्टवॉच केवळ ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये पूर्ण दिवस वापरण्यायोग्य बॅटरी लाईफ देतं. तसंच बॅटरी पूर्ण चार्ज करून १४ दिवस वापरली जाऊ शकते.

आणखी वाचा : रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये स्पर्धा : अनलिमिटेड डेटा, कॉल आणि OTT अ‍ॅप्स एका महिन्यासाठी मोफत

HONOR Watch GS 3 specifications
Honor Watch GS3 मध्ये १.४३ इंचाचा (४६६ x ४६६पिक्सेल) AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले आहे. या स्मार्टवॉचमध्ये ३२ MB रॅम आणि ४ GB इंटरनल स्टोरेज आहे. हे घड्याळ Android 6.0 आणि iOS 9.0 वर चालणार्‍या डिव्हाईसना सपोर्ट करतं. या घड्याळात एक्सेलेरोमीटर सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि एअर प्रेशर सेन्सर देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Oppo Reno 8 Lite 5G स्मार्टफोन लॉन्च, ६४ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज

Honor Watch GS3 मध्ये, ब्लूटूथद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकरवरून कॉल केले जाऊ शकतात. हे 5ATM रेटिंगसह वॉटर व डस्ट रेजिस्टेंस आहे. Honor च्या या स्मार्टवॉचची डायमेंशन्स ४५.९×४५.९×१०.५ mm आणि वजन ४४ ग्रॅम आहे. हे घड्याळ ब्लूटूथ ५.०, GPS, GLONASS, NFC सारख्या फिचर्ससह मिळतं.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Honor Watch GS3 ओशन ब्लू, मिडनाईट ब्लॅक आणि क्लासिक गोल्ड कलरमध्ये खरेदी करता येईल. या घड्याळाची किंमत १२,९९९ रुपये आहे आणि त्याची विक्री ७ जूनपासून Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत घड्याळ ९ महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI ऑफरसह मिळू शकतं. सिटीबँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड तसंच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० टक्के झटपट सूट मिळेल.