स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor लवकरच भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोन प्रेमींसाठी कंपनी देशात जबरदस्त स्मार्टफोन लवकरच घेऊन येणार आहे. आता कंपनी आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. अलीकडेच कंपनीचे हेड माधव शेठने Honor च्या आगामी स्मार्टफोनचा टीझर सोशल मिडियावर शेअर केला होता. आता हा स्मार्टफोन पुढल्या महिन्यात दाखल होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीये.
Honor X9b आता बाजारपेठेत येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अखेर ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. याशिवाय फोनचा ड्रॉप टेस्ट व्हिडिओही समोर आला आहे. या फोनचा डिस्प्ले तुटणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. अलीकडेच, माधव सेठ यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महिंद्रा थार एसयूव्ही फोनवरून जाते, तरीही फोनला काहीही होत नाही, असे या व्हिडिओमध्ये दिसते.
काय असेल खास?
या स्मार्टफोनचे डिझाइन व्हिडिओद्वारे समोर आले होते. Honor चा हा फोन आधीच चीनमध्ये लॉन्च झाला आहे. यात ६.७८ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेट आणि १२०० x २६५२ पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. फोनमध्ये ५,८००mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह ३५W फास्ट चार्जिंग फीचर असेल. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात १०८MP मुख्य, ५MP अल्ट्रा वाइड आणि २MP मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६MP कॅमेरा असेल. हा फोन सनराईज ऑरेंज, मिडनाईट ब्लॅक, एमराल्ड ग्रीन आणि टायटॅनियम सिल्व्हर रंगांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
(हे ही वाचा: कागदासारखा दिसणारा टॅबलेट भारतात लॅान्च! काय आहेत वैशिष्ट्ये एकदा पाहाच…)
कधी होणार लाँच?
Honor चा हा फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकतो. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, हा मिड-बजेट स्मार्टफोन भारतात ८ किंवा ९ फेब्रुवारीला लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय फोनची किंमत आणि अनेक फीचर्सही लीक झाले आहेत. याशिवाय Honor भारतीय बाजारात Chice Earbuds X5 लाँच करेल. या इअरबड्सचा अनबॉक्सिंग व्हिडिओही अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
किंमत किती?
रिपोर्टनुसार, Honor X9b हा फोन Honor X90 5G प्रमाणेच २५,००० ते ३५,००० रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. Qualcomm Snapdragon 6 Gen १, १२GB RAM, २५६GB स्टोरेज यासारखे शक्तिशाली फीचर्स फोनमध्ये मिळू शकतात. हा फोन Android 13 वर आधारित Magic OS ७.२ सह ऑफर केला जाऊ शकतो. हा फोन Realme 11 Pro सिरिजला जोरदार टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे.