फेक कॉल, स्कॅम कॉलची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. मात्र, आता नागरिकदेखील अशा अनोळखी नंबरवरून येणारे फोन घेताना चांगलेच सतर्क राहू लागले आहेत. परंतु, या फसवणूक करणाऱ्या लोकांना आपले फोन नंबर कसे मिळतात? ते आपली संपूर्ण माहिती कुठून मिळवतात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. आज आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.

स्कॅम कॉलची प्रकरणं ही केवळ आपल्या देशात वाढत नसून, याचा त्रास इतर मोठ्या देशांनाही होत आहे. अमेरिकेमध्ये अशा प्रकरणात २०२१ साली २०२० पेक्षा ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे; तर युकेमध्ये दर १० पैकी ४ लोकांना असे फोन येतात. यातील दोन टक्के लोक हे फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांच्या सर्व आज्ञांचे पालन करतात, असे एका अभ्यासात समोर आल्याची ‘टेक्स्टमॅजिक’वरून माहिती मिळते.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

हेही वाचा : गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?

फसवणूक करणारे आपला फोन नंबर कुठून मिळवतात?

प्रत्येकाकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यावर विविध फॉर्म्स भरण्यापासून ते तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये लॉगइन कारण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी आपण करत असतो आणि या सर्वांसाठी आपण आपली ओळख पटवून देण्यासाठी आपल्या चालू फोन नंबरचा वापर करतो. आपल्या ई-मेल आयडीप्रमाणेच आपला फोन नंबरदेखील आपल्या वैयक्तिक माहितीअंतर्गत येतो, ज्याचा उपयोग प्रत्येक जण दररोज करत असतो.

म्हणूनच फसवणूक करणारे आपल्या फोन नंबरचा वापर करतात. हे नंबर्स मिळविण्यासाठी ते खालील पद्धतींचा वापर करतात.

डार्क वेब –

फसवणूक करणारे डार्क वेबवर विक्रीसाठी असलेल्या फोन नंबर्सची भरपूर प्रमाणात खरेदी करतात. ‘टेक्स्टमॅजिक’च्या माहितीनुसार, एखाद्या अमेरिकन नागरिकाची वैयक्तिक माहिती ही केवळ आठ डॉलर्स म्हणजे ६७७ रुपयांना विकत घेता येते.

नंबर जनरेटर –

ऑटो-डायलर [ auto-dialer] नावाच्या तंत्राचा वापर फसवणूक करणाऱ्यांकडून केला जातो. यामध्ये हे तंत्र, कोणत्याही व्यक्तीचा नंबर शोधून त्या व्यक्तीला फोन करते.

सोशल मीडिया आणि इंटरनेट

प्रत्येकाचे फोन नंबर हे इंटरनेटवर, विविध सोशल मीडिया माध्यमांवर, वेबसाइट्स आणि फोन डिरेक्टरीमध्ये वापरले जातात. याच इंटरनेटवरील माहितीतील फोन नंबर गोळा करण्यासाठी, फसवणूक करणारे ‘वेब-स्क्रॅपिंग’सारख्या तंत्रांचा वापर करतात.

हेही वाचा : ‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

फसवणूक करणारे आपल्या फोन नंबरचा वापर कसा करतात?

फसवणुकीसाठी आपल्या फोन नंबरचा वापर तीन पद्धतींनी केला जातो.

१. पैसे चोरण्यासाठी

कोणत्याही बँकेच्या, कंपनीच्या नावाखाली अथवा तातडीची आवश्यकता असल्याचे सांगून तुमच्याकडून पैश्यांची मागणी केली जाते. उदाहरणार्थ, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा अपघात किंवा इतर गंभीर दुर्घटना झाली असून, त्यांच्यावर इलाज करण्यासाठी पैसे मागितले जाऊ शकतात.

२. खाजगी माहिती मिळवण्यासाठी

तुमची आर्थिक अथवा खाजगी माहिती मिळवण्यासाठी तुमच्या फोन नंबरचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी फसवणूक करणारी व्यक्ती बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी असल्याचे खोटे सांगू शकतो.

३. डिजिटल किंवा ऑनलाइन खात्यांचा ताबा मिळवण्यासाठी

तुमच्या अकाउंटची सुरक्षा करण्यासाठी फसवणूक करणारी व्यक्ती एखाद्या मोठ्या कंपनीची आयटी विभागात काम करणारी अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या अकाउंटचा अनधिकृतपणे ताबा मिळवू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या डिव्हाइसमध्ये अँटीव्हायरस टाकण्याच्या कारणाने ते तुमच्या अकाउंटचा ताबा मिळवू शकतात.

हेही वाचा : Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

स्कॅम कॉल्सपासून सावधान कसे राहावे?

कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला फोन करून, कोणत्याही गोष्टीसाठी तातडीने पैश्यांची मागणी करत नाहीत अथवा तुमची खाजगी माहिती तुम्हाला विचारात नाहीत. त्यामुळे असा संशयास्पद फोन आल्यास तो फोन स्कॅम कॉल असण्याची शक्यता असते; असे फोन ओळखावे.

तसेच, फसवणूक करणारे कोणत्याही बँकेचे कर्मचारी असल्याचा दावा करून तुमच्याकडून तुमची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती फोन करून विचारू शकतात. मात्र, अधिकृत बँका अशी माहिती मागत नाहीत. त्यामुळे कुणी तुम्हाला फोनवरून अशी माहिती विचारल्यास सावध राहावे.

अशुद्ध किंवा चुकीचे इंग्रजी बोलल्यानेदेखील अनेक फसवणुकीचे प्रकार पकडण्यात आले आहेत. त्यामुळे अनोळखी नंबरवरून बोलणारी व्यक्ती कुठून बोलत आहे आणि कशी बोलत आहे याबद्दल सतर्क राहावे.

सर्वात महत्त्वाचे, कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला आपली खाजगी, वैयक्तिक माहिती सांगू नका. तुमचे पासवर्ड, बँकेची माहिती किंवा लॉगइनसंबंधी सर्व गोष्टी गुप्त ठेवा.

[टीप- वरील प्राप्त माहिती ही टेक्स्टमॅजिकवरून मिळवण्यात आली आहे.]