AI Animal Communication : आपण जे काही लिहितो, वाचतो, ऐकतो व पाहतो ते समजण्यासाठी भाषा खूप महत्त्वाची ठरते. या पृथ्वीवर अब्जोवधींच्या संख्येने असलेला माणूस एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध भाषांचा उपयोग करीत असतो. मात्र, संवाद हा केवळ मानवापुरता मर्यादित नाही. आपल्या सभोवताली असणारे प्राणी, उंच आणि मोकळ्या आकाशात भरारी घेणारे पक्षी यांचीही संवाद साधण्याची आपली एक स्वतंत्र अशी भाषा आहेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रस्त्यावर भुंकणारे कुत्रे, विजेच्या तारांवर बसून किलबिलाट करणारे पक्षी किंवा आपल्या पायांशी घुटमळत ‘म्याव-म्याव’ करणारे मांजर हे त्यांच्या विशिष्ट आवाजात एकमेकांशी संवादच साधत असतात. मात्र, कधी कधी ‘हे प्राणी नेमके काय बोलत असतील बरं?,’ असा एक प्रश्न आपल्या मनात सहज चमकून जातो. घरी एखादा प्राणी पाळलेला असेल, त्यांना हा प्रश्न कधी ना कधी पडतोच. पण आपण खरेच प्राण्यांची भाषा ‘रूपांतरीत’ करून समजून घेऊ शकतो, असे तुम्हाला कुणी सांगितले तर?
AI च्या मदतीने वटवाघळांची भाषा रूपांतरीत करण्याचा प्रयोग [द बॅट विस्परर]
आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या आपण कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवता येऊ शकतो. प्राण्यांची भाषा जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या, इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठातील प्राध्यापक योस्सी योवेल [Yossi Yovel] या संशोधकाने प्राणी त्यांच्या विशिष्ट आवाजांमधून नेमके काय बोलत असतात हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. त्यामध्ये योस्सी यांनी इस्राईलमधील वटवाघळांवर अभ्यास करून वटवाघळांचे आवाज, त्यांची हालचाल आणि ते पक्षी कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर वटवाघळांच्या भाषेचे रूपांतर करण्यासाठी आधी योस्सी आणि त्यांच्या टीमने AI चा वापर करून, वटवाघळांच्या आवाजांचे ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातील प्रचंड मोठा डेटा गोळा केला. पुढे प्रत्येक आवाज आणि त्याचा वेगवेगळा अर्थ यांमधील फरक कसा ओळखायचा हे संगणकाला समजावून दिले. अशाच पद्धतीने योस्सीच्या टीमने व्हॉइस रेकग्निशन प्रोग्रामला मार्गदर्शन करून, प्रोग्रामच्या अल्गोरिदमने स्क्रीनवर दिसणाऱ्या वटवाघळांच्या संवादाची योग्य आवाजाशी सांगड घातली. “या सगळ्याच्या शेवटी वटवाघळांची भाषा समजून घेऊन, ते काय बोलत आहेत हे संगणक आपल्याला सांगेल,” असे योस्सी यांच्या टीममधील अदि रचूम [Adi Rachum] यांनी बीबीसीला दिलेल्या व्हिडीओ मुलाखतीमध्ये सांगितले. इतकेच नाही, तर वटवाघळांचा आवाज ऐकून, त्याचा अर्थ लावून, ऐकवलेला आवाज हा खाण्यासंबंधी असल्याचे योस्सीच्या टीमने तयार केलेल्या ‘AI ट्रान्स्लेटर’ने ओळखून दाखवले.
“माझ्या हयातीत तरी प्राणी वा पक्ष्यांची भाषा बोलून दाखविणाऱ्या यंत्राची निर्मिती होईल, असे मला वाटत नाही. मात्र, AI हे आपल्याला नक्कीच त्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल,” असे बीबीसीला माहिती देताना योस्सी योवेल यांनी म्हटले आहे.
प्राण्यांच्या हावभावांचा अर्थ लावणारे AI
प्राण्यांची भाषा समजून घेण्यासाठी किंवा तिचा अर्थ लावण्यासाठी AI चा वापर करणारा योस्सी योवेल हा एकमेव संशोधक नसून, लिंकन विद्यापीठातील पशुवैद्यकीय वर्तणुकीशी संबंधित औषधांचे प्राध्यापक, डॅनियल मिल्स यांनीदेखील AI कडे अशी क्षमता असल्याचे म्हटले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले पाळीव प्राणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा अर्थ लावण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती गार्डियनच्या अहवालातून मिळते.
डॅनियल मिल्स यांची टीम ही कुत्रा, मांजर, घोडा यांसारख्या प्राण्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांच्या अर्थ लावण्यासाठी AI ची मदत घेत आहे. त्यासाठी ते इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडीओंचा आधार घेत आहेत. या AI अॅप्लिकेशनच्या मदतीने प्राण्यांचे केवळ संवाद समजून न घेता, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील समजून घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अॅप्लिकेशनद्वारे प्राण्यांशी संबंधित अनेकविध गोष्टींची काळजी घेता येऊ शकते. जसे की, या तंत्रज्ञानाच्या मदतीने गाईचे दूध काढताना तिला वेदना होत आहेत की नाही हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊन, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ शकते.
AI च्या मदतीने पाळीव प्राण्यांची भाषा समजून घेणे हे केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीपुरते मर्यादित नसून, त्याचा फायदा प्राण्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच जीवशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यातील इन्साईट/ अंतर्गत दृष्टिकोण देण्यास मदत करू शकते. ब्रिफरप्रमाणे विविध संशोधक AI च्या मदतीने झेब्रा, गेंडा यांसारख्या विविध प्राण्यांच्या आवाजांचा अभ्यास करून, आपल्या मानवी भाषेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती इंडिया टुडेच्या लेखावरून मिळते.
हेही वाचा : बोली असो वा प्रमाण, मराठी भाषेची गोडी तुमच्या मुलांना कशी लावाल? ‘खलबत्ताशी’ खास बातचीत…
परंतु, प्राण्यांची भाषा बोलणारे किंवा त्या भाषेचे १०० टक्के भाषांतर करणारे यंत्र कधी निर्माण होईल याबद्दल ठोस माहिती अजून तरी आपल्याला ज्ञात नाही. मात्र, जर असे तंत्रज्ञान विकसित झाले, तर त्याचा फायदा पशुवैद्यांना किंवा प्राण्यांच्या मालकांना खरंच होऊ शकतो का? प्राण्यांना काही होत असेल, त्यांना कुठे काही लागले असेल, तर ते आपल्याला स्पष्टपणे शब्दांत सांगू शकत नाहीत. एखाद्या सांकेतिक भाषेमध्ये प्राणी त्यांच्या भावना त्याच्या मालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ- प्राण्यास भूक लागली असल्यास तो त्याच्या खाऊच्या डब्याकडे आपल्याला घेऊन जातो. किंवा तब्येत बरी नसल्यास मालकाच्या कुशीत शिरून राहतो, वेगळेवेगळे आवाज काढतो, कधी कधी शांत प्राणीही प्रचंड चिडचिड करू लागतात. त्यांच्या अशा वागण्यावरून आपण प्राण्यांना काहीतरी होत असल्याचा अंदाज बांधत असतो.
मात्र, प्राण्यांशी टेलिपॅथिकली संवाद साधणाऱ्या, त्यांच्या भावना समजून घेणाऱ्या ‘सोल्स सिनर्जी इन्साईट्स’च्या [soul synergy insights] अदिती देवधर यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला तेव्हा त्यांनी हा प्रयोग होत असलेल्या AI तंत्रज्ञानाबद्दल नेमके काय सांगितले ते पाहा. “सोशल मीडियावर माणसांचे आवाज मांजरीच्या भाषेत ट्रान्स्लेट करणाऱ्या गॅजेटचा व्हिडीओ मी पाहिला आहे. मात्र, ते गॅजेट मी फक्त सोशल मीडियावर पाहिलं असल्यानं ते यंत्र खरं असेलच, असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, भविष्यात जर प्राण्यांच्या भाषेचे भाषांतर करणारे असे काही तंत्रज्ञान विकसित झाले, तर ते प्राण्यांच्या मालकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल,” असे अदिती सांगतात.
“एखाद्या प्राण्याला उपचारासाठी त्याचे मालक पशुवैद्याकडे घेऊन जातात; मात्र त्या क्षणी तो प्राणी त्याचे शेवटचे श्वास घेत असतो. अशा वेळेस त्या प्राण्याला आपण हॉस्पिटलमध्ये न राहता, घरात असले पाहिजे, असं वाटू शकतं किंवा एखाद्या प्राण्यावर सुरू असणाऱ्या उपचारांचा त्याला त्रास होत असेल, त्याला ते उपचार स्वतःला नको असतील, तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ते प्राणी आपल्याला अशा गोष्टी सांगू शकतात.”
“मात्र कितीही झालं तरी, AI हे तंत्रज्ञान एक वेळ संवादाचं रूपांतर करू शकेल; पण प्राण्याच्या भावना कितपत समजून घेऊ शकेल याबाबत शंका आहे,” असेही अदिती यांनी सांगितले.
हेही वाचा : Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…
तर, एकंदरीत विविध प्रयोग आणि संशोधनांवरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सर्व प्राण्यांची भाषा खरंच किती रूपांतरित करू शकतं, या प्रश्नाचं ठोस उत्तर आपल्याला भविष्यातच मिळेल. मात्र, तोपर्यंत प्राणी आणि मालकांमधील संवाद अधिक सोपा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या, तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्पीच बटणांचा वापर घरातील पाळीव प्राणी कसे करतात ते पाहा.
व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील hunger4words नावाच्या अकाउंटवरून घेतला गेला आहे. तसेच वरील वटवाघळाच्या प्रयोगाबद्दलची ही माहिती बीबीसीच्या एका व्हिडीओवरून मिळवली आहे. प्राण्यांच्या हावभावांबद्दलच्या अभ्यासाची माहिती ही इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली.