You Can Now Share Favourite Scenes From Movies With Netflix Moments : आपल्यातील अनेक जण सुटीच्या आदल्या दिवशी एखादी नुकतीच रिलिज झालेली वेब सीरिज डाउनलोड करून, त्या वेब सीरिजमधील सर्व भाग पूर्ण रात्रभर वा एकाच दिवशी पाहत असतील. बहुतेक जणांना सीरियल किंवा सहसा चित्रपटातला एखादा सीन (scene) आवडला आणि तो सीन इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला की, आपण तो रिपोस्ट करून स्वतःच्या स्टोरीला लावतो.

पण, आता नेटफ्लिक्सने आपल्या नवीन ‘मोमेंट्स’ (Netflix Moments) फीचरद्वारे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासह चित्रपट, टीव्ही शोमधील तुमचे आवडते दृश्य (scenes) शेअर करण्याची सोय केली आहे. हे फीचर फक्त नेटफ्लिक्स मोबाईल ॲपवर (Netflix mobile app) उपलब्ध असेल आणि सध्या स्ट्रीमिंग सेवेच्या आयओएस युजर्सद्वारे वापरले जाऊ शकते. तर, नेटफ्लिक्स ॲण्ड्रॉईड (Netflix Android) ॲपवर मोमेंट्ससाठी हे फीचर पुढील आठवड्यात उपलब्ध होईल.

हेही वाचा…‘सर्व्हिस सेंटरचा फुटेज दाखवा…’ ओला कंपनीच्या दिवाळी सेलिब्रेशन VIDEO वर कॉमेडियन कुणालची कमेंट; CEO वर साधला निशाणा

नेटफ्लिक्स मोमेंट्स म्हणजे काय (What is Netflix Moments) :

नेटफ्लिक्स मोमेंट्स एक फीचर आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे युजर्स त्यांच्या आवडत्या चित्रपट आणि मालिकांतील प्रसिद्ध दृश्ये बुकमार्क व सेव्ह करू शकतात आणि ते दृश्य मित्रांबरोबर शेअरही करू शकतात. सोशल मीडियावर सीरियल, सिनेमाच्या अनेक क्लिप्स आधीच लोकप्रिय झालेल्या असतात. त्यामुळे Netflix या स्पर्धेत सामील होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याच्या कन्टेन्टकडे अधिक लक्ष वेधले जाऊ शकते.

मोमेंट्स फीचर कसं वापरायचं?

नेटफ्लिक्सच्या ब्लॉग पोस्टनुसार स्ट्रीमरच्या मोबाईल ॲपवर कंटेन्ट पाहताना एक नवीन ‘मोमेंट्स’ पर्याय असेल. हा पर्याय प्लेबॅक स्पीड, एपिसोड, ऑडिओ व सबटायटल्स यांसारख्या इतर मीडिया प्लेयर पर्यायांच्या बाजूला असेल. Netflix वर एक मोमेंट सेव्ह करण्यासाठी युजर्सना फक्त स्क्रीनच्या तळाशी स्वाईप करणे आणि Moments पर्यायावर टॅप करणे आवश्यक आहे. या कृतीनंतर युजर्सना पाहिजे ती संबंधित क्लिप मोबाईल ॲपमधील My Netflix टॅबमध्ये सेव्ह होईल. मग युजर्सना ते दृश्य इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅटद्वारे मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबासह शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.