Airtel 5g network in cities : देशात हळूहळू ५ जी सेवेचा विस्तार होत आहे. गेल्या आठवड्यात जिओने पुण्यात ५ जी सेवा सुरू केली. तर, एअरटेलने नुकतेच बिहारमधील पाटणाच्या काही भागांमध्ये ५ जी सेवा सुरू केली आहे. दोन्ही कंपन्या आपली सेवेची कक्षा वाढवत असून ग्राहकांना देखील वेगवान इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येत आहे. काही विमातळांवरदेखील ५ जी सेवा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना चांगला अनुभव येण्यासाठी ही सेवा देण्यात आली आहे. एअरटेल ५ जी सेवा सध्या किती शहरांमध्ये उपलब्ध आहे? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एअरटेल ५ जी सध्या १२ शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दिल्ली, सिलिगुडी, बंगळुरू, हैदराबाद, वाराणसी, नागपूर, मुंबई, चेन्नई, गुरुग्राम, पाणीपत आणि गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे. कंपनीने नुकतेच पाटण्याच्या अनेक भागांमध्ये ५ जी सेव सुरू केली आहे. यामध्ये पाटणा साहिब गुरुद्वारा, पाटणा रेल्वे स्थानक, डाक बंग्लो, मौर्या लोक, बेली रोड, बोरींग रोड, सिटी सेंटर मॉल, पाटलीपुत्र इंडस्ट्रिअल एरिआ आणि काही इतर ठिकाणांचा समावेश आहे.

(विक्री वाढवण्यासाठी झोमॅटोची धडपड, केला ‘हा’ उपाय)

विमानतळावरही सेवा

केम्पेगौडा आतरराष्ट्रीय विमानतळ बंगळुरू, लोहेगाव विमानतळ पुणे, लाल बहादूर शास्त्री आतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी, बाहासाहेब आंबेडकर आतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर आणि पाटणा विमानतळावर एअरटेलची ५ जी सेवा उपलब्ध आहे.

एअरटेलला जोरदार टक्कर देणारे रिलायन्स जिओ देखील ५ जी सेवा उपलब्ध करण्यात मागे नाही. जिओची ५ जी सेवा देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध असून जिओ आपले हातपाय पसरत आहे. सध्या दिल्ली एनसीआर, मुंबई, वाराणसी, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नाथद्वार, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबाद या शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध असून अगदी गुजरातच्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्येही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(मोठी बातमी! ५४ लाख TWITTER युजर्सचा डेटा लीक; डेटामध्ये ‘ही’ माहिती)

पुढील वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात ५ जी सेवा उपलब्ध करून देण्याचे अश्वासन रिलायन्स जिओने दिले आहे, तर एअरटेलदेखील मार्च २०२४ पर्यंत सर्व शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many cities airtel 5g network available check list ssb