स्मार्टफोनमुळे डिजिटल जगात क्रांती झाली आहे. आता कोणीही असा नसेल ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही. सध्याच्या काळात घरातील किराणा आणण्यापासून ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापर्यंत बहुसंख्य कामे आपण स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतो. मात्र आपल्या स्मार्टफोनमध्ये असेही काही फीचर्स असतात जे आपल्यालाच माहित नसतात. असेच एक फीचर म्हणजे ‘सीक्रेट मेन्यू’.
सीक्रेट मेन्यू हे फीचर वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे. या फीचरच्या मदतीने आपण फोनची सिग्नल स्ट्रेंथ तपासू शकतो. तुमच्या आयफोनमध्ये एक नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला या सीक्रेट मेन्यूचा अॅक्सेस मिळेल. अँड्रॉइड फोनसाठी हा मेन्यू सक्रिय करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. काही स्टेप्सचा वापर करून अँड्रॉइड युजर्स हे फीचर अॅक्टिव्हेट करू शकतात.
Photos : iPhone 13 आणि 12 वर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या, किती रुपये वाचणार
आयफोन युजर्ससाठी स्टेप्स :
- आयफोन युजर्सनी 3001#12345# हा नंबर डायल करावा.
- कॉल केल्यावर लगेचच तो कट करावा.
अँड्रॉइड युजर्ससाठी स्टेप्स :
- अँड्रॉइड युजर्सनी सेटिंगमध्ये जाऊन ‘अबाऊट फोन’ या पर्यायावर क्लिक करावे.
- यानंतर ‘स्टेटस’ पर्यायावर जाऊन ‘सिम स्टेटस’ निवडा. असे केल्याने तुम्हाला ‘सिग्नल स्ट्रेंथ’ चा पर्याय मिळेल.
Photos : आता YouTubeवर विना जाहिराती बघता येणार Video; फक्त करा ‘हे’ काम
हे फीचर सापडल्यानंतर तुम्हाला इतर अनेक पर्याय मिळतील. यातील एका पर्यायावर जाऊन तुम्ही तुमच्या फोनची ‘सिग्नल स्ट्रेंथ’ जाणून घेऊ शकता. या मेन्यूमध्ये फोनची तांत्रिक माहिती दिली आहे. यापैकी बहुतेक पर्याय तुम्हाला उपयोगी नसतील. या फीचरसह, एलटीई आरएसआरपी (LTE RSRP) (रेफरन्स सिग्नल रिसीव्ह्ड पॉवर) पर्याय फोनच्या सिग्नल्सची संपूर्ण माहिती देईल. तुमच्या फोनचा सिग्नल -१४० आणि -४० च्या दरम्यान असल्यास ते चांगले मानले जाते.