जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक उलथापालथ झाले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या उच्च अधिकाऱ्यांना आधी नोकरीवरून काढले. नंतर जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. कंपनीला नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मस्क यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी ही पेड सेवा अमेरिका, यूके आणि इतर देशांमध्ये सुरू झाली. अमेरिकेत या सेवेसाठी युजर्सला ७.९९ डॉलर्स द्यावे लागतील. तर भारतात किती रुपये द्यावे लागतील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान भारतात ७१९ रुपये ब्ल्यू टिकसाठी द्यावे लागू शकतात, असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही भारतीय ट्विटर युजर्सना ट्विटर ब्ल्यूसाठी सब्सक्राइब करा, असे सांगणारे प्रॉम्प्ट दिसून आले आहेत. त्यातून १० नोव्हेंबर २०२२ पासून ट्विटर ब्ल्यू टिकसाठी ७१९ रुपये द्यावे लागतील असे समजते. ही सेवा आधी अ‍ॅपल युजरला मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या युजर्सनी ट्विटर ब्ल्यू सेवा सब्सक्राइब केली असेल त्यांना इतर फायदे देखील मिळण्याची शक्यता आहे. अशा युजर्सना ट्विटरवर रिच आणि डिस्प्लेच्या बाबतीत प्राधन्य दिले जाईल, असे मस्क यांनी म्हटले होते.

(‘अमेझॉन पे’ मधील बॅलेन्स बँक खात्यात पाठवायचा आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

ट्विटर ब्ल्यू सेवा विवादात?

ट्विटर ब्ल्यू पेड सेवा विवादास्पद ठरत आहे. ट्विटर पेड सेवेमुळे गैरवापर करणाऱ्यांनाही व्हेरिफिकेशन बॅज मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर ट्विटर ब्ल्यूचा कोणी गैरवापर केल्यास त्याचे खाते कायमचे निलंबित केले जाईल, असे मस्क यांनी म्हटले आहे. या सेवेचा गैरवापर होईल की नाही, हे आता काळच सांगेल.

क्रयशक्तीवर आधारीत असेल किंमत

मस्क यांनी ट्विटर ब्ल्यूच्या प्लानबाबत माहिती देताना, अमेरिकेबाहेर या सेवेची किंमत देशाच्या क्रयशक्तीवर आधारित असेल, असे म्हटले होते. यावरून अमेरिकेपेक्षा भारतात या सेवेसाठी कमी किंमत मोजावी लागेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, भारतीय युजर्सना दिसलेला हा प्रॉम्प्ट जर खरा असेल तर ७१९ रुपये प्रति महिना हे फार महाग वाटत आहे. भारतीय व्हेरिफिकेशन बॅजसाठी इतके पैसे खर्च करणार का? हे आता सेवा सुरू झाल्यावरच समजेल.