How to activate jio 5g iphone : देशात ५ सेवा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. या दरम्यान एअरटेल आणि रिलायन्स जिओने आपल्या ५ जी सेवेचा अनेक शहरांमध्ये विस्तार केला आहे. देशातील ५० शहरांमध्ये आता ५ जी सेवा मिळत आहे. अलीकडे अ‍ॅपलने आयफोन युजर्ससाठी १६.२ अपडेट लाँच केल्याने युजर्सना ५ जी सेवा वापरण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. युजर्सना आपल्या ५ जी स्मार्टफोनवर आता वेगवान इंटरनेट वापरता येईल. मात्र, आयफोनमध्ये एअरटेल किंवा रिलायन्स ५ जी सेवा कशी अ‍ॅक्टिव्हेट करायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चला आयफोनमध्ये एअरटेल आणि रिलायन्स जिओ ५ जी सेवा कशी अ‍ॅक्टिव्हेट करायची याबाबत जाणून घेऊया.

१) एअरटेल ५ जी

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

आयफोनमध्ये airtel 5g वापरण्यासाठी एअरटेल ५ जी सपोर्ट असणारे सीम आणि ज्या भागात तुम्ही राहाता तेथे ५ जी सेवा सुरू असणे आवश्यक आहे. ५ जी सुरू करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(लॅपटॉपवरूनही करू शकता WHATSAPP VIDEO CALL, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

  • मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जा.
  • त्यानंतर मोबाईल डेटा उघडून मोबाईल डेटा ऑप्शनमध्ये व्हॉइस अँड डेटा हा पर्याय तुम्हाला दिसून येईल. येथे ५जी सुरू करणारे टोगल प्रेस करा. यानंतर तुम्हाला स्टॅटस बारवर ५ जी नेटवर्क इंडिकेटर दिसून येईल.

२) जिओ ५ जी

जिओ अजूनही देशातील अनेक भागांत ५जीच्या चाचण्या घेत आहे. जिथे केवळ निवडक युजर्सना ५ जी वापरता येते. मात्र, जे लोक जिओ ५जी वेल्कम प्रोग्रामचा भाग आहे ते ५ जी असलेल्या भागात असल्यास त्यांनी अमर्यादित ५ जी स्पीड मिळते.

(Flipkart Big Saving Days निमित्त सुवर्णसंधी, POCO च्या 5G फोन्सच्या किंमतीत मोठी घट, पाहा यादी)

jio 5g सुरू करण्यासाठी माय जिओ अ‍ॅप सुरू करू शकता. यात तुम्हाला ५ जी वापरण्यासाठीची सूचना दिसेल. एकदा साइन अप केल्यानंतर जिओच्या प्रोग्राममध्ये तुमचा समावेश करण्यात आला आहे, असा मेसेज तुम्हाला येईल. यानंतर ५ जी सेवेसाठी पात्र होण्यासाठी युजरला २३९ आणि त्यावरील प्लानचे रिचार्ज करावे लागेल. आणि यानंतर केवळ फोनचे नेटवर्क ५ जीमध्ये बदलावे लागेल.