Google Maps Hacks: स्मार्टफोन्सच्या वापरामुळे लोक डिजिटल झाले आहेत. आत्ताची तरुण पिढी प्रत्येक गोष्टीमध्ये गुगलचा वापर करत असल्याचे पाहायला मिळते. शिक्षण, मनोरंजन अशा गोष्टींपासून ते जेवण बनवणे, एखादा पदार्थ ऑर्डर करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये सर्वजण गुगलची मदत घेत असतात. या सर्च इंजिनच्या अन्य सुविधाचा वापरही दैनंदिन जीवनामध्ये केला जातो. अशीच एक सेवा म्हणजे गुगल मॅप्स. प्रवास करण्यासाठी गुगल मॅप्सची खूप मदत होत असते.
गुगल मॅप्समध्ये होम आणि ऑफिस लोकेशन सेट करण्याची सेवा उपलब्ध आहे. या फीचरमुळे एखाद्या ठिकाणाहून घरी किंवा ऑफिसला जाण्यासाठी संपूर्ण पत्ता टाकायची गरज नसते. अशा वेळी मॅप्सवर फक्त होम किंवा ऑफिस या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या घरचा/ ऑफिसचा पत्ता गुगल मॅपमध्ये एंटर होतो. ही सेवा उपभोगण्यासाठी तुम्हाला गुगल मॅप्सच्या सेटिंग्समध्ये काही ठराविक बदल करणे अनिवार्य आहे. चला तर मग गुगल मॅप्सवर एखादे ठराविक लोकेशन कसे सेट करावे ते समजून घेऊयात…
गुगल मॅप्सवर ठराविक जागा सेट करण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स –
- Google maps अॅप उघडा. खालच्या टूलबारच्या मध्यभागी Saved हे ऑप्शन दिसेल.
- वेबवर गुगल मॅप वापरत असल्यास उजव्या कोपऱ्याच्या वरच्या भागात Hamburger menu दिसेल. त्यावर क्लिक करुन Your Places हे ऑप्शन दिसेल.
- Labelled ऑप्शन निवडून नवी विंडो उघडा. ही कृती केल्यावर नव्या विंडोमध्ये Home आणि Office असे ऑप्शन्स दिसतील.
- घरचा पत्ता गुगल मॅप्सवर सेट करण्यासाठी तेथे योग्य पत्ता टाकून सर्च करा. त्यानंतर आलेले लोकेशन Home म्हणून सेट करा.
- जर तुमचा पत्ता सर्च होत नसेल, ती ठराविक जागा पीन करुन त्या जागेचा पत्ता नीट सेट करता येतो.
(घराप्रमाणे तुम्ही ऑफिस, कॉलेज असे वेगवेगळ्या जागा मॅप्सवर सेट करु शकता.)
सेट केलेले हे लोकेशन काही कारणांमुळे बदलावे लागू शकतात. यामध्ये बदल करायचा असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.
- Google maps अॅप उघडा. खालच्या टूलबारच्या मध्यभागी Saved या ऑप्शनवर क्लिक करा.
- Labelled ऑप्शन निवडून नवी विंडो उघडा. जे लोकेशन बदलायचे आहे त्याच्यासमोर असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा.
- तेथे Edit लिहिलेले दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही ठराविक लोकेशन बदलू किंवा अपडेट करु शकता.
(Labelled वरुन नव्या टॅबवर गेल्यावर तेथे Edit प्रमाणे Remove आणि Change icon असे काही ऑप्शन पाहायला मिळतील. त्यातील Remove या बटणावर क्लिक करुन तुम्ही ते लोकेशन डिलीट करु शकता. तर Change icon वर क्लिक केल्याने लोकेशनच्या आयकॉनमध्ये बदला करता येतात.)