Samsung एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अनेक नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये अनेक फीचर्स आणि अपडेट कंपनी वापरकर्त्यांना देत असते. त्यातच जर का तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन वापर असाल तुम्हाला Samsung Wallet माहिती असेलच हे वॉलेटमधून तुम्हाला UPI अकाउंट, DigiLocker ID, प्रीपेड वॉलेट, लस प्रमाणपत्र आणि अन्य सेवा वापरता येतात. कंपनीने आपली पेमेंट सेवा ‘सॅमसंग पे बॅक’ २०१७ मध्ये लॉन्च केली होती. अलीकडेच तिचे नाव सॅमसंग वॉलेट असे करण्यात आले.

जेव्हा कधी तुम्हाला सॅमसंग वॉलेट App मधून UPI च्या मदतीने पेमेंट करायचे असेल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ते App ओपन करावे लागेल. तेथील मेनूवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर BHIM UPI accounts’ वर क्लिक करावे लागेल आणि शेवटी ‘QR कोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल. परंतु साधे पेमेंट करण्यासाठी ही थोडी लांबलचक प्रक्रिया असू शकते.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : Vivo X90 Series: विवो उद्या लॉन्च करणार ‘हे’ दोन तगडे स्मार्टफोन्स; OLED डिस्प्लेसह मिळणार…

त्याऐवजी तुम्ही बारकोड स्कॅनिंग पद्धतीचा वापर करून एका क्लिकवर UPI पेमेंट करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर सॅमसंग वॉलेट स्कॅन आणि पे शॉर्टकट तयार करू शकता. ते हे कसे तयार करायचे त्य्याच्या काय काय स्टेप्स आहेत ते जाणून घेऊयात.

१. Samsung Wallet App वर लॉन्ग प्रेस करा आणि Add to home screen वर क्लिक करा.
२. त्यांनतर तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सॅमसंग वॉलेटचा शॉर्टकट तयार होईल.

३. त्यानंतर आता तुमच्या होमस्क्रीनवर तयार झालेल्या सॅमसंग वॉलेटचा पर्याय लॉन्ग प्रेस करा आणि म्हणजे तते ओपन होईल व त्यातील फीचरचा वापर तुम्हाला करता येईल.
४. ‘स्कॅन अँड पे’ या पर्यायावर लॉन्ग प्रेस करा. त्यानंतर होम स्क्रीनवर आयकॉन ड्रॉप करा.

५. त्यानंतर तुमच्या फोनवर स्कॅन अँड पे हा शॉर्टकट तयार होईल. ज्याचा वापर करून तुम्ही बारकोड स्कॅन करून UPI पेमेंट करू शकता.

हेही वाचा : WhatsApp Features 2023: ”आजपासून तुम्ही जास्तीत जास्त…” ; मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

Paytm, Google Pay, PhonePe आणि BharatPe सारख्या UPI-आधारित पेमेंट स्वीकारणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला या सॅमसंग वॉलेटमधून तुम्ही पेमेंट करू शकता.