How To Add Song To Spotify From Instagram : इन्स्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत. रीलमध्ये किंवा पोस्टमध्ये एखादं नवीन गाणं ऐकलं की, सगळ्यात पहिले आपण त्याचे नाव शोधण्यास सुरुवात करतो. पण, कधी कधी काही केल्या ते सापडत नाही, त्यामुळे आता इन्स्टाग्राम टिकटॉकवरून एक फीचर कॉपी करत आहे, जे युजर्सना इतर लोकांच्या पोस्ट, रील आणि शॉर्ट्समधून गाणे त्यांच्या Spotify प्लेलिस्टमध्ये जोडण्याची परवानगी (Add Song To Spotify From Instagram ) देत आहे.

एक्स (ट्विटर) वरील अलीकडील पोस्टमध्ये इन्स्टाग्रामने घोषणा केली की, इन्स्टाग्रामच्या प्रत्येक युजर्ससाठी हे फीचर आणत आहे. तुम्ही इन्स्टाग्रामवर नवीन गाणे ऐकलं असेल आणि ते तुम्हाला ॲप न सोडता तुमच्या स्पॉटिफाई प्लेलिस्टमध्ये जोडायचं असेल तर तुम्ही सोप्या स्टेप्स फॉलो करून ते करू शकता.

WhatsApp Chat Memory feature
WhatsApp Chat Memory Feature : लवकरच व्हॉट्सॲप होणार तुमचा पर्सनल असिस्टंट, तुमच्या आवडीनिवडी ठेवणार लक्षात, पाहा कसं वापरायचं नवं फीचर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा
Flipkart Big Diwali Sale goes live From Today
Flipkart Big Diwali Sale : दिवाळीपूर्वी ‘हे’ १० स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, डिस्काउंट, कॅशबॅकचा घेता येईल आनंद, वाचा काय आहे ऑफर
The new Jio Diwali offers are valid until 5 November 2024
Jio Diwali Dhamaka Offer : जिओच्या ‘या’ दोन रिचार्जवर मिळणार डिस्काउंट कूपन; ३,३५० रुपयांच्या फायद्यासाठी कूपन कसं मिळवायचं ते बघा
who is OpenAI's first chief economist
OpenAI’s First Chief Economist : OpenAIचे पहिले-वहिले मुख्य अर्थतज्ज्ञ! कोण आहेत आरोन चॅटर्जी? जाणून घ्या तीन मुद्द्यांमध्ये
AI chatbots like ChatGPT and Perplexity can also be used as search engines
Chromeवर Google Searchऐवजी ChatGPT आणि Perplexity AI कसे बदलावे? जाणून घ्या सोपी पद्धत
Apple exports iPhone
Make in India : ६ अब्ज डॉलर्सच्या ‘आयफोन्स’ची चीन नाही, भारतातून निर्यात

इन्स्टाग्रामवरून स्पॉटिफाईमध्ये गाणे कसे जोडायचे? (How To Add Song To Spotify From Instagram) :

१. इन्स्टाग्राम रील, पोस्ट किंवा स्टोरीमध्ये तुम्ही ऐकलेले गाणे स्पॉटिफाईमध्ये जोडण्यासाठी, गाण्याच्या नावावर टॅप करा. तुम्हाला ऑडिओ प्लेयरच्या उजव्या बाजूला स्क्रीन दिसेल, जिथे एक “Add” बटण असेल, ज्याच्या जवळ एक स्पॉटिफाय आयकॉन असेल.

२. “Add” बटणावर क्लिक केल्यानंतर इन्स्टाग्राम तुम्हाला तुमच्या अकाउंटला स्पॉटिफाईशी लिंक करण्यास सांगेल.’ Link Spotify’वर टॅप करा. निवडल्यानंतर ते गाणं थेट तुमच्या स्पॉटिफाय प्लेलिस्टमध्ये जोडले जाईल.

हेही वाचा…How To Book Cheap Flights : आता विमानाने प्रवास करणं होईल स्वस्त? गूगलने आणलंय नवं फीचर; कसं वापरायचं बघा

पण, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत TikTok मध्ये युजर्स त्यांच्या आवडत्या गाण्यांना मल्टिपल म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये जोडू शकतात. इन्स्टाग्राममध्ये फक्त स्पॉटिफाई हाच एक पर्याय उपलब्ध असेल, त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब म्युझिकसारख्या दुसरा म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरत असाल, तर इन्स्टाग्रामचा हा फीचर तुमच्यासाठी उपयुक्त नसू शकतो.

इन्स्टाग्रामने गेल्या काही आठवड्यात अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. या नव्या सुविधांमध्ये एक नवीन कस्टमायझेबल प्रोफाइल कार्ड आणि प्लॅटफॉर्मवरील जाहिरातदारांसाठी AI व्हिडीओ फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर आणि आकर्षक अनुभव मिळेल.

Story img Loader