पॅनकार्ड हे महत्त्वाचे दस्तएवज आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डची गरज भासते. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी देखील पॅनकार्ड योग्य पुरावा मानले जाते. दररोजच्या व्यवहारात उपयोगी असणारे पॅन कार्ड सर्वांकडे असणे आवश्यक झाले आहे. अशात जर तुम्ही नवे पॅनकार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी कोणतीही मोठी प्रक्रिया करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या नवे पॅनकार्ड बनवण्यासाठी अप्लाय करू शकता. यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवे पॅनकार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या या स्टेप्स वापरा

  • नवे पॅनकार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करताना https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html ही अधिकृत वेबसाईट उघडा.
  • यानंतर एक फॉर्म दिसेल, त्यात नाव, ईमेल, मोबाईल नंबर अशी विचारण्यात आलेली माहिती भरा.
  • तुमच्याकडे याआधी एखादे पॅनकार्ड होते का, तसेच आता अप्लाय करण्यात येणारे पॅनकार्ड पहिले आहे, याची माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे (सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात) सबमिट करावे लागतील.
  • डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर तुम्हाला याची फी म्हणजेच काही रक्कम भरावी लागेल.
  • त्यानंतर १५ अंकी रेजिसस्ट्रेशन नंबर तयार होईल.
  • या रेजिस्ट्रेशनच्या नंबरच्या माध्यमातून पॅनकार्ड ट्रॅक करू शकता.
  • पॅन कार्ड तयार झाल्यानंतर पोस्टाने ते घरी पाठवले जाईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to apply for new pan card online use these steps pns