गुगल डॉक्स (Google Docs ) हे इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेले ॲप्लिकेशन आहे. याचा उपयोग विविध डॉक्युमेंट्स आणि स्प्रेडशीट तयार करण्यासाठी केला जातो. या फाइल्स तुम्ही तयार करू शकता, संपादित करू शकता व सेव्हही करून ठेवू शकता. याचे वैशिष्ट्य म्हणजे तयार केलेली डॉक्युमेंट्स तुम्ही लॅपटॉप, संगणक यांच्यावरदेखील उघडू शकता. फक्त त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट किंवा ब्राउजर हवा. तर आज आम्ही तुम्हाला गुगल डॉक्समध्ये डबल स्पेस कसा द्यायचा याच्या काही सोप्या पायऱ्या सांगणार आहोत.
लॅपटॉप, कॉम्प्युटरवर गुगल डॉक्समध्ये डबल स्पेस कसे द्याल?
१. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर तुम्ही गुगल डॉक्स ॲप डाउनलोड केले असेल, तर गुगल डॉक्स (Google Docs) उघडा.
२. नवीन ब्लँक पेज घ्या (Blank Page) आणि त्यातील ओळ (Line) व परिच्छेद (Paragraph) यांचे अंतर बदलण्यासाठी पूर्ण डॉक्युमेंटचे स्वरूप बदलून घ्या.
३. पण, तुम्हाला जो मजकूर बदलायचा आहे, तो सगळ्यात पहिल्यांदा हायलाइट करून घ्या.
४. त्यानंतर फॉरमॅट (Format)वर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन (Drop Down ) मेन्यूमध्ये जाऊन रेषा आणि परिच्छेदाचे अंतर (Line & Paragraph Spacing) हे निवडा.
५. त्यानंतर सब मेन्यूमधील डबल (Double) हा पर्याय डबल स्पेस करण्यासाठी निवडा.
६. या पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी सर्व मजकूर प्रथम हायलाइट (Highlight) करा.
हेही वाचा…व्हॉट्सॲपचं नवं फिचर लाँच! ग्रुपबरोबर करता येणार व्हॉईस चॅट…
मोबाईलमध्ये गुगल डॉक्सवर डबल स्पेस कसे द्याल :
१. गुगल डॉक्स (Google Docs) ॲप उघडा आणि एखादी फाईल (File) निवडा.
२. त्यानंतर पुढे पेन्सिलसारख्या (Edit) दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक करा.
३. तुमहाला जो मजकूर बदलायचा आहे त्याला हायलाइट (Highlight ) करा.
४. त्यानंतर ए (A) हे चिन्ह निवडा आणि पॉप-अप (pop-up menu) मेन्यूमधून परिच्छेद (Paragraph) निवडा.
५. त्यानंतर लाइन स्पेसिंगच्या (Line Spacing) पुढे डबल स्पेस (2.00) स्विच करण्यासाठी वरच्या बाणावर क्लिक करा.