How To Avoid Scams NPCI Share Tips : दिवाळी या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत, तर या सणानिमित्त विविध कंपन्यांनी विविध सेलची घोषणासुद्धा केली आहे. एखादा सेल सुरू झाला की स्वस्तात मस्त वस्तू विकत घेण्याकडे आपल्या प्रत्येकाचे लक्ष असतं. पण, याचा फायदा अनेक हॅकर्ससुद्धा घेतात. तुमचं एक चुकीचं पाऊल आणि तुमचं बँक अकाउंट रिकामं अशीसुद्धा परिस्थिती तुमच्यावर उद्भवू शकते. कारण सणासुदीच्या काळात खरेदीत मोठ्या संख्येने वाढ होते आणि स्वस्तात मस्त वस्तू खरेदी करण्याच्या नादात अनेक ग्राहक सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्तापसुद्धा होऊ शकतो. म्हणूनच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय (NPCI) ने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले (How To Avoid Scams) दिले आहेत.

काय आहेत हे सल्ले चला जाणून घेऊयात (How To Avoid Scams)

१. झटपट ऑफर आणि सूट आदी गोष्टींमुळे तुमच्याकडून जास्त प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते. पटकन या ऑफर्स मिळविण्याच्या नादात अनेकदा तुमच्याकडून प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता आहे का या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे अनोळखी विक्रेते आणि संशयास्पद कंपन्यांची चांगली माहिती असणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
proper blood pressure test
ब्लड प्रेशर तपासताना हात कसा ठेवावा? बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय?
PETA India sends a letter to Salman Khan
Bigg Boss 18: सलमान खानच्या राशीला गाढवाचे ग्रहण, पेटाकडून पत्र; नेमकं काय घडलंय? पेटा संस्था काय काम करते?
Shocking video animal fight video deer vs lion video viral on social media
VIDEO: “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही” सिंहाची अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
brand market down in china
एकेकाळी ब्रॅण्ड्सचं माहेरघर असणार्‍या चीनमध्ये बनावटी वस्तूंचं जाळं; कारण काय?
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर

२. ऑफर्ससाठी साइन अप करताना, आवश्यक नसलेली वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करू नका, कारण यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा…How To Book Cheap Flights : आता विमानाने प्रवास करणं होईल स्वस्त? गूगलने आणलंय नवं फीचर; कसं वापरायचं बघा

३. खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कचा वापर करू नका, त्यामुळे तुमची आर्थिक माहिती सहज हॅकर्सना मिळू शकते.

४. सणासुदीच्या काळात खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, आपण नक्की काय काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवण्यात ग्राहकांकडून चुक होऊ शकते, यामुळे अनेक जण फिशिंग स्कॅम्सला बळी पडू शकतात. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी दोनदा तपासून पाहा.

५. तुमच्या खात्यांवर साधे किंवा डीफॉल्ट पासवर्ड वापरण्यापासून वाचा, कारण यामुळे तुम्ही हॅकर्ससाठी निशाण्यावर येऊ शकता. प्रत्येक खात्यासाठी स्ट्रॉंग आणि वेगळा पासवर्ड तयार करा, जेणेकरून तुमची सुरक्षा वाढेल.

तर तुम्हीसुद्धा ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना एनपीसीआयने दिलेले मुद्दे लक्षात ठेवा (How To Avoid Scams)आणि हॅकर्सला बळी पडू नका.