तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाईलवर कोणतेही काम एका क्लिकवर करणे सहज शक्य झाले आहे. यामुळे आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे. अगदी महिन्याचा किराणा विकत घेण्यापासून बँकेचे व्यवहार करण्यापर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या या प्रगतीचे जसे अनेक फायदे आहेत तसेच याचे काही तोटे देखील आहेत. याचा गैरफायदा घेत सायबर क्राईमसारखे प्रकार घडतात. यामुळे केवळ फोन नंबरवरून किंवा एखादी लिंक शेअर करून मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स चोरी केले जातात. ज्यांना अशा घटनांची कल्पना नसते त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वेळा स्पॅम कॉल्सवरूनही तुमची वैयक्तिक माहिती विचारून तुम्हाला सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकवले जाऊ शकते. यापासून वाचण्यासाठी मोबाईलमध्ये अशा अननोन नंबर्सबाबत सेटिंगमध्ये बदल करू शकता, कसे बदलायचे हे सेटिंग जाणून घ्या.

आणखी वाचा : BSNL ने लाँच केले वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध होणारे दोन नवे रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या ऑफर

स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळवण्यासाठी या स्टेप्स वापरून बदला मोबाईलमधील सेटिंग

  • अँड्रॉइड फोन मध्ये ऑटोमॅटिक स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
  • यासाठी गूगल डायलरची गरज भासेल. जर तुमच्या फोनमध्ये डिफॉल्ट ॲप गूगल डायलर असेल तर तुम्ही सहजरित्या स्पॅम कॉल्स ब्लॉक करू शकता.
  • यासाठी सेटींग्समध्ये जा, त्यामध्ये वरच्या बाजुला तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करा.
  • त्यामध्ये पुन्हा सेटिंग पर्याय दिसेल त्यामधील ‘कॉलर आयडी अँड स्पॅम’ हा पर्याय निवडल्यानंतर टॉगल ऑन करा.
  • त्यानंतर फिल्टर स्पॅम कॉल्स पर्याय निवडा, अशाप्रकारे स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळवता येईल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to block spam calls in smartphone use these easy steps pns