सध्या ऑनलाईनच्या जमान्यात व्हिडीओ कॉलिंगला (WhatsApp Video Call) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यात गुगल मीट, झूम व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करू शकतो. मात्र अनेकदा एखाद्या महत्वाच्या व्हिडीओ कॉलिंगदरम्यान आपण कुठेतरी बाहेर असतो, अशावेळी मनात असूनही व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलची बॅकग्राऊंड ब्लर करू शकत नाही. सध्या फक्त गुगल मीट आणि झूम व्हिडीओ कॉलिंग अॅपवरचं ब्लॅकग्राऊंड ब्लर करण्याची सुविधा आहे. पण तुम्हाला व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगदरम्यानही बॅकग्राऊंड ब्लर करायची आहे, तर मग खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा.
आयफोनवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगदरम्यान बॅकग्राउंड ब्लर कशी करायची?
तुम्ही आयफोनवरील कंट्रोल सेंटरवर जाऊन व्हॉट्सअॅपची बॅकग्राऊंड ब्लर करु शकता. परंतु या ऑप्शनचा वापर करण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ कॉलवर असणं गरजेचं आहे. पण या सुविधेचा वापर फक्त iOS 15 ऑपरेटिंग सिस्टमच्या मोबाईलवर तसेच iPhone XR किंवा नंतरच्या व्हर्जनचं करता येईल.
१) WhatsApp व्हिडिओ कॉलिंगवर असताना कंट्रोल सेंटर ओपन करण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यातून खाली स्वाइप करा.
२) आता इफेक्टवर टॅप करा.
३) ते ऑन करण्यासाठी पोर्ट्रेट चिन्हावर टॅप करा.
यामुळे व्हॉट्सअपची बॅकग्राऊंड ब्लर होईल आणि तुमचा चेहराच फक्त स्पष्ट दिसेल. अशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड फोनवरही तुम्ही व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगच बॅकग्राऊंड ब्लर करु शकता. पण त्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लरचं वेगळ ऑप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
सॅमसंग गॅलेक्सीवर व्हिडीओ कॉलिंगदरम्यान बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
व्हिडीओ कॉलिंगदरम्यान बॅकग्राऊंड ब्लर करण्याचं हे फिचर फक्त सॅमसंगच्या मोबाइलव्यतिरिक्त इतर कोणत्याही मोबाइलमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात व्हॉट्सअपकडूनचं बॅकग्राऊंड ब्लरचं नवं फिचर जोडलं जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलक्सी मोबाइलवर बॅकग्राऊंडब्लर कसे करता येईल जाणून घ्या.
१) सर्वप्र सेटिंग्जमध्ये जा.
२) आता सेटिंगमध्ये स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अॅडव्हान्स फिचर ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
३) आता व्हिडिओ कॉल इफेक्ट टॉगल ऑन करा.
४) आता तुम्हाला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलमध्ये बॅकग्राउंड ब्लर करण्यासाठी खाली अनेक ऑप्शन दिसतील, तुम्हाला पाहिजे तो कलर सिलेक्ट करून तुम्ही बॅकग्राऊंड ब्लर करू शकता.
सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाइसेसवरील हे फिचर फक्त व्हिडिओ कॉलिंगच्याच अॅप्सना सपोर्ट करते. आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी वगळता इतर कोणत्याही फोनमध्ये व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगदरम्यान बॅकग्राउंड ब्लर करण्याचे ऑप्शन देण्यात आलेले नाही.