सध्या भारतातील रेल्वेचे जाळे अधिक मजबूत होताना दिसत आहे. तसेच शहरी भागांमध्ये मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे. तसेच नवीन मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे काम सुरु आहे. आता मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो कार्पोरेशन (DMRC) ने व्हॉट्सअ‍ॅपवर आधारित तिकीट सर्व्हिसचा अधिक विस्तार केला आहे. ही तिकीट सिस्टीम जून महिन्यामध्ये एअरपोर्ट एक्सप्रेस लाइनवर लॉन्च करण्यात आली होती. या सर्व्हिसला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे डीएमआरसीने आता गुरुग्राम रॅपिड मेट्रोसह दिल्ली- एनसीआरमधील सर्व लाइन्सवर या तिकीट सर्व्हिस सिस्टीमची सुरुवात केली आहे. ही सर्व्हिस मेटा आणि त्याची अधिकृत भागीदार असलेल्या Pelocal Fintech Pvt. Ltd च्या मदतीने सुरु केली गेली आहे.

”व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतीयांच्या अधिक आवडीचे प्लॅटफॉर्म आहे. आता मेट्रोचे तिकीट खरेदी करणे एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला मेसेज करण्याइतके सोपे झाले आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही सिस्टीम प्रवासासाठी दिल्ली मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करतील.” असे डीएमआरसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास कुमार म्हणाले. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ChatGPT now available on WhatsApp
ChatGPT on WhatsApp: व्‍हॉट्सअ‍ॅपवर चॅटजीपीटीचा कसा करायचा वापर? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स; पण असेल ही एक अट
How To Use Same WhatsApp Number On Two Mobiles
एकच व्हॉट्सॲप नंबर दोन फोनमध्ये वापरणे शक्य आहे का? मग समजून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया
Pune Video
Pune Video : सावधान! पीएमटीची ऑनलाईन तिकीट चुकूनही फेकू नका; तिकिटावर दिसतोय तुमचा UPI ID आणि मोबाईल नंबर, व्हायरल होतोय व्हिडीओ
truck message board trending owner written behind truck emotional Message marathi
“जपले असते तर…” ‘ट्रकच्या मागे मालकानं लिहिला भावनिक मेसेज; वाचून तुम्हाला कळेल नात्यांची किंमत
Mobile fell into the hot water vessel which was on gas viral video social media
‘या’ कृतीची तिला किंमत मोजावी लागली, जेवण करताना वापरत होती फोन अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं…

हेही वाचा : मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ शहरात WhatsApp च्या मदतीने खरेदी करता येणार तिकीट

व्हॉट्सअ‍ॅपवरून मेट्रोचे तिकीट कसे बुक करायचे?

१. सर्वात पहिल्यांदा ९६५०८५५८०० या नंबरवर hi असा मेसेज पाठवावा.

२. त्यानंतर तुम्ही कोणत्याही मेट्रो स्टेशनवरील QR कोड स्कॅन देखील करू शकता.

३. त्यानंतर तुम्हाला जी भाषा हवी असेल ती भाषा निवडावी.

४. त्यानंतर तिकीट ‘खरेदी करा’ यावर क्लिक करावे.

५. त्यानंतर मेट्रोमध्ये बसण्याचे व ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणची नावे त्यात प्रविष्ट करावी.

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: वनप्लस, सॅमसंगसह ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट; काय आहेत ऑफर्स? जाणून घ्या

६. त्यानंतर तुम्हाला किती तिकिटे हवी आहेत तो एकदा तिथे भरावा.

७. तुम्ही भरलेले डिटेल्स तपासावेत व पेमेंट प्रोसेस सुरु करावी.

८. प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही एक पेमेंट करण्यासाठी लिंक येईल.

९. तुम्ही पेमेंट केले तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर QR कोड असलेले तिकीट प्राप्त होईल.

या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

१. या सिस्टीमचा वापर करणारा वापरकर्ता एका वेळी ६ QR तिकीट जनरेट करू शकतो.
२. सर्व मेट्रो लाइन्ससाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६६ या वेळेत तिकीट खरेदी
३. एअरपोर्ट लाइनसाठी सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत तिकीट बुक केले जाऊ शकते.
४. एकदा बुक केलेलं तिकीर रद्द करता येणार नाही.
५. डेबिट किंवा क्रेडिट कार्डावरून व्यवहार केल्यास सुविधा शुल्क आकारले जाईल.
६. युपीआय आधारित व्यवहारांवर सुविधा शुल्क लागणार नाही.

७. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले तिकीट मेट्रो स्टेशनवरील QR कोड स्कॅन देखील करू शकता.

Story img Loader