Boost Your WiFi Speed Instantly : कधी कधी दिवसभर मोबाईलचे नेट अपुरे पडते. चित्रपट, वेब सीरिज, मालिका किंवा जास्त एमबीचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मोबाईलचे नेट अपुरेच पडते. त्यामुळे आपल्यातील बरेच जण घरी वायफाय लावून घेतात. वायफाय वेगवान आणि अधिक विश्वासार्ह सुविधा असली तरी काही वेळा अचानक लाईट जाणे, नेट न चालणे आदी अनेक समस्यांना आपल्या सगळ्यांनाच तोंड द्यावे लागते. मग यामुळे काम थांबते आणि मूडसुद्धा खराब होतो. तर या समस्या सोडविण्यासाठी, आम्ही तुम्हाला आज मदत करणार आहोत.
आम्ही तुमच्यासाठी अशा पाच टिप्स घेऊन आलो आहोत; जेणेकरून तुम्ही कामाच्या वेळी हाय स्पीडने वायफाय वापरू शकता... (WiFi Speed)
१. राउटरची योग्य जागा निवडा – तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये तुमचा राउटर कुठे ठेवता, हे महत्त्वाचे आहे. भिंतींनी झाकलेल्या जागा किंवा कोपऱ्यांमध्ये राउटर बसवणे टाळावे. तुमचा राउटर नेहमी हॉलसारख्या मोकळ्या जागेत किंवा ऑफिसच्या मध्यभागी असणाऱ्या भिंतीवर ठेवा; जेणेकरून सर्व ठिकाणी (घर किंवा ऑफिसमध्ये) सिग्नलचे वितरण योग्य प्रकारे होईल.
२. डिव्हायसेसची संख्या मर्यादित करा – जेव्हा तुम्ही तुमच्या वायफायशी अनेक डिव्हाइस कनेक्ट करता, तेव्हा स्वाभाविकपणे त्याचा स्पीड कमी होऊन जातो. त्यामुळे कनेक्ट केलेल्या डिव्हायसेसची संख्या कमी करणे सोईचे ठरेल. कनेक्शन मर्यादा सेट करण्यासाठी तुम्हाला राउटरची सेटिंग्ज तपासावी लागेल आणि नको असलेले डिव्हाइस किंवा कोणी वायफाय वापरत नसल्यास ते डिव्हाइस डिस्कनेक्ट करा.
३. राउटर रीस्टार्ट करा – जर तुम्ही राउटर दिवसभर चालू ठेवत असाल, तर ती एक मोठी समस्या आहे. कारण- त्यामुळे तुमच्या इंटरनेटचा वेग कमी होऊ शकतो. तर अशी समस्या जाणवल्यावर वायफाय रीस्टार्ट करा. काही मिनिटांसाठी राउटर बंद करा आणि नंतर तो पुन्हा चालू करा. ही सोपी युक्ती तुमच्या इंटरनेटचा वेग सुधारेल आणि तुमची सिस्टीम रिफ्रेश करण्यातही मदत मिळेल.
४. गरजेनुसार राउटर रीसेट करा – तुमचा राउटर एकापेक्षा जास्त वेळा किंवा विनाकारण रीस्टार्ट करण्यात काहीच नुकसान नाही. कारण- वायफायच्या सतत वापरामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. राउटर रिस्टोअर करण्यासाठी रिसेट बटण वापरा, जे तुमच्या राउटरच्या मागील बाजूस डीफॉल्ट सेटिंग्जमध्ये असेल. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी दूर होऊ शकतात.
५. राउटर अपग्रेड करा – जुने राउटर जुन्या तंत्रज्ञानावर चालत आहे का हे तपासून बघितले पाहिजे. कारण- यामुळे तुमचा इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. जर तुम्ही वर्षानुवर्षे तोच राउटर वापरत असाल, तर तुम्ही त्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. परिसरात हाय स्पीड कनेक्शन हाताळण्यासाठी चांगल्या क्षमतेसह नवीन मॉडेलमध्ये तुमचा राउटर अपग्रेड करा.