डिजीलॉकर नावाप्रमाणेच, डिजिटल लॉकर. डिजीलॉकर अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सेव्ह करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड आणि पॉलिसी यासारखी कागदपत्रे सेव्ह करू शकता आणि गरज पडेल तेव्हा वापरू शकता. एकदा तुम्ही डिजिलॉकर उघडल्यानंतर तुम्ही तुमच्या कागदपत्रांऐवजांची एक प्रत इथे अपलोड करू शकता आणि ती सुरक्षितपणे संग्रहित करू शकता. या अ‍ॅपपमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट स्टोरेजसाठी क्लाउड स्टोरेज देखील मिळते.

अपलोड केलेल्या दस्तऐवजांची सत्यता तपासण्यासाठी डिजीलॉकरमध्ये संपूर्ण प्रणाली आहे. जेणेकरून युजर्स डिजीलॉकरद्वारे सरकारी संस्थांसोबत ई-डॉक्युमेंट्स शेअर करू शकतील. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर डिजिलॉकरमध्ये तुम्हाला हवं तेव्हा अपडेट करू शकता. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेला फोन नंबर DigiLocker खात्यासह अपडेट करू शकता. डिजिलॉकर खात्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर कसा अपडेट करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
do you know advantage of pressing red button in pune
पीएमटी बसमधील या लाल बटणाचा काय उपयोग आहे? VIDEO होतोय व्हायरल
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच

जाणून घ्या पद्धत :

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर डिजिलॉकर अ‍ॅप उघडा
  • नंतर युजर्सचे नाव आणि ६ अंकी सिक्यूरिटी कोडसह आपल्या खात्यात साइन इन करा.
  • आता तुमचे लॉगिन डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या डिजिलॉकरशी लिंक केलेल्या फोन नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
  • यानंतर OTP बॉक्सच्या खाली दिसणार्‍या Update Your Mobile Number या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर UIDAI ने पाठवलेला OTP टाका.
  • त्यानंतर नवीन मोबाईल नंबर टाका.
  • आता लॉगिन डिटेल्सचे व्हेरिफीकेशन करण्यासाठी नवीन मोबाईल नंबरवर डिजिलॉकरद्वारे प्राप्त केलेला OTP टाईप करा.

यानंतर, तुम्हाला तुमच्या डिजिलॉकर खात्यातील मोबाईल नंबरमधील बदलाबाबत कन्फर्मेशन नोटिफिकेशन मिळेल.