How do you talk to someone after being blocked? पर्सनल असो वा प्रोफेशनल, दोन्ही गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. आपल्यापैकी बहुतेक सर्वचजण व्हॉट्सॲप हे वापरतो. सर्वाधिक वापरलं जाणारं हे इन्स्टंट मेसिजिंग ॲप असून याच्या अनेक फीचर्सबद्दल आपल्याला माहितही नसतं. आता अनेकदा व्हॉट्सॲपवर एखादा युजर दुसऱ्या युजरला ब्लॉक करतो, म्हणजे संबधित युजर आता त्याला कोणताच मेसेज कॉल व्हॉट्सॲपद्वारे करु शकत नाही. कधी कोणी आपल्यावर रागावतो तर कधी अन्य कारणाने आपल्याला व्हॉट्सॲपवर ब्लॉक करतो. व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकत नाही. पण काही ट्रिक फॉलो करुन तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्यांना मेसेज देखील पाठवू शकता.
व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे
व्हॉट्सॲपवर ब्लॉक असूनही मेसेज पाठवण्याचा पहिला मार्ग म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे. त्या व्यक्तीला यामध्ये जोडा. एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले असले तरीही तुम्ही ग्रुपमधील त्या व्यक्तीशी बोलू शकता.
पुन्हा WhatsApp अकाऊंट तयार करा
तुम्ही तुमचं WhatsApp अकाऊंट डिलीट करून पुन्हा WhatsApp इन्स्टॉल करून पुन्हा अकाऊंट तयार करू शकता. पुन्हा अकाऊंट तयार केल्यानंतर तुम्ही WhatsApp वर त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकाल.
नवीन WhatsApp अकाऊंट तयार करा
तुम्ही दोन नंबर वापरत असाल तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या नंबरसह नवीन WhatsApp अकाऊंट तयार करू शकता. या नव्या नंबरमुळे तुम्ही तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईल नंबरची गरज भासणार आहे.
WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे हे कसे कळेल?
जर तुमचा मित्र किंवा कोणीही तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा संशय आला तर तुम्हाला आधी त्याची ऑनलाइन स्थिती आणि लास्ट सीन चेक करावे लागेल. हेे दोन्ही तुम्हाला आधी दिसत असेल आणि नंतर नाही तर कदाचीत तुम्ही ब्लॉक झाले आहेत.पण हो याचा अर्थ असा नाही की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे याची १००% गॅरंटी नाही, कदाचित त्या व्यक्तीने हे दोन्ही पर्याय त्याच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये लपवले असतील. तसंच मेसेज सेंड झाल्यावर डबल टिक्स आणि ब्लू टिक्स दिसतच नसतील, तर समजा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलले आहे. पण तरीही कन्फर्म होत नसेल कारण समोरच्याने प्रायव्हसीमध्ये जाऊन डबल टिक किंवा ब्लू टिक hide केलेले असू शकते. सेंडकेलेला मेसेज जर पोहोचत नसेल किंवा समोरच्याला तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये अॅड करु शकत नसाल तर समजा तुम्हाला ब्लॉक केलं आहे.