वायुप्रदूषणामुळे आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदल, वाढते प्रदूषण, हिवाळ्यात पडणारे धुके यांमुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. या वातावरणाचा हृदयाचे विकार असणाऱ्यांना, दम्याचा त्रास असणाऱ्यांना, श्वसनाशी निगडित आजार असणाऱ्यांना जास्त त्रास होतो. अशा व्यक्तींना हवेची गुणवत्ता तपासून ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ तपासून त्यानुसार घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो. ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ जाणून घेण्यासाठी गूगॅल मॅप्स मदत करणार आहे. काय आहे गूगल मॅप्सचे फीचर जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गूगलकडे हवेची गुणवत्ता ट्रक करणारे फीचर उपलब्ध आहे. गूगल मॅप्सवरून तुम्ही हे चेक करू शकता. या फीचरमुळे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ जाणून घेता येईल. यावरून घराबाहेर पडायचे की नाही याचा निर्णय घेता येईल. गूगल मॅप्समध्ये हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

या स्टेप्स वापरुन तपासा हवेची गुणवत्ता

  • सर्वात आधी तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिवाइसवर, गूगल मॅप्स उघडा.
  • त्यानंतर लोकेशन सर्च करा किंवा टार्गेट पर्यायावर क्लिक करुन करंट लोकेशन सर्च करू शकता.
  • लोकेशन सेट झाल्यानंतर वर उजव्या बाजुला असणाऱ्या लेअर्स पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये मॅप टाईप्स आणि मॅप डिटेल्स असे पर्याय उपलब्ध होतील.
  • त्यामधील मॅप डिटेल्समध्ये ‘एअर क्वालिटी’ पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
  • त्यामध्ये ‘नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स’मधून गूगल तुम्ही निवडलेल्या लोकेशनची हवेची गुणवत्ता किती आहे ते दाखवेल.