दिवाळी आता अगदीच उंबरठ्यावर आली आहे. दिवाळी म्हणजे सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन म्हणजे छानसे फोटो तर हवेतच ना! दिवाळीत आपण सेलिब्रेशनच्या नादात छान फोटो टिपतो खरे. पण नंतर सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी जातो, त्यावेळेस आपला हिरमोड झालेला असतो. कारण दिवाळीचे फोटो रात्रीच्या वेळेस कमी प्रकाशात टिपण्याचा प्रयत्न आपण केलेला असतो आणि अनेकदा कमी प्रकाशामुळे फोटो काळपट किंवा अगदीच घाणेरडे येतात. मूळ फोटोही एवढा घाणेरडा असतो की, तो सुधारून वापरणेही तसे कठीणच जाते. तर हा असा ‘मूड ऑफ’ ऐन दिवाळीत नको म्हणून समजून घ्या, काही ट्रिक्स!

आणखी वाचा : फोन मधील बॅटरी लवकर संपते का? मग ‘हे’ अ‍ॅप्स तातडीने काढा, गुगलनेही प्लेस्टोअरवरून हटवलेत

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…

नाईट मोड
अलीकडे जवळपास सर्वच मोबाइल फोन्सना नाईड मोड नावाची एक सुविधा देण्यात आलेली असते. त्यावर तुम्हाला कमी प्रकाशामध्ये उत्तम फोटो टिपता येतात. प्रत्येक ब्रॅण्डच्या फोनमध्ये नाईट मोड असतोच असतो. फक्त त्यातून टिपल्या गेलेल्या छायाचित्रांमध्ये एकसमानता नसते, कारण प्रत्येकाची स्पेसिफिकेशन्स वेगवेगळी असतात. पण एका गोष्टीची खात्री आहे ती म्हणजे कमी प्रकाशातील फोटो या मोडवर चांगले येतात. एरवी नेहमीच्या फोटो मोडवर फोटो क्लिक करताना कमी प्रकाशात रंगांची तीव्रताही बदलत जाते. प्रत्यक्षात दिसतात तसे रंग नेहमीच्या फोटो मोडमध्ये टिपलेल्या छायाचित्रात दिसत नाहीत. रंगांचाच बेरंग होऊ नये म्हणून वापरा नाईट मोड!

आणखी वाचा : अबब.. २४ तासांत अ‍ॅपलचे ५० टक्के कर्मचारी घटले? अशी झाली कारवाई

हात स्थिर ठेवा…
नाईट मोडवर फोटो क्लिक करताना काही बाबी मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वात पहिली बाब म्हणजे या मोडवर फोटो क्लिक करताना तुमचा हात स्थिर असू द्या. कारण या मोडवर एकाच वेळेस अनेक छायाचित्रे टिपली जातात. त्यावेळेस तुमचा हात हलला, तर आपल्याला मिळणाऱ्या छायाचित्राच्या गुणवत्तेवर, त्याच्या क्लॅरिटीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळेच आपला हात या मोडवर छायाचित्र टिपताना स्थिर असायला हवा. या मोडवर टिपलेल्या अनेक छायाचित्रांना एकत्र करून उत्तम परिणाम साधणारे चांगले छायाचित्र आपल्याला मोबाइलमध्ये उपलब्ध करून दिले जाते.

आणखी वाचा : आता WhatsApp वर ऑनलाईन आहात ते कोणालाही समजणार नाही; फक्त बदला ही सेटिंग

टाइमर
नाईट मोडवरच दोन किंवा तीन सेकंदांचा टाइमरही उपलब्ध असतो. त्याचाही वापर तुम्हाला फोटो टिपताना करता येऊ शकतो. या मोडवर देखील तुमचा हात स्थिर असणे आवश्यक असते. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कॅमेरा ठेऊन फोटो टिपणार आहात, त्या ठिकाणी कॅमेरा सरकणार नाही, स्थिर राहील याची काळजी घ्यायला हवी.

आणखी वाचा : नवे पॅनकार्ड बनवायचे आहे? ‘या’ स्टेप्स वापरून करा ऑनलाईन अप्लाय

सावली येणार नाही, हे पाहा
छायाचित्रासाठी उपलब्ध प्रकाश व्यवस्थित आहे, ना याची काळजी घ्यायला हवी. म्हणजेच प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेनेच तुमचा कॅमेरा नाहीना याची काळजी घ्या. म्हणजे ज्या दिव्याच्या किंवा बल्ब अथवा प्रकाशाच्या इतर स्रोताच्या प्रकाशात फोटो टिपायचा त्याच्या दिशेने कॅमेरा असता कामा नये. तर प्रकाशाच्या स्रोताच्या बाजूला कॅमेरा ठेऊन जे टिपायचे त्यावर त्याचा प्रकाश असेल याची काळजी घ्यायला हवी. फोटो टिपताना तुमची किंवा इतर कुणाची सावली त्यात येणार नाही, याचीही खबरदारी घ्या

आणखी वाचा : दिवाळी सेलिब्रेशन! जीओचा ‘हा’ ऑफर आपल्याला वर्षभर ठेवेल ‘अॅक्टीव’

नाईट मोड काम कसा करतो?
कॅमेऱ्यामध्ये प्रकाश टिपणारा एक सेन्सर काम करत असतो. त्याचा आकार साधारणपणे सर्वच मोबाइलमध्ये सारखाच असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचे शटर दीर्घकाळ उघडे राहील, याची काळजी घेतली तर आतमध्ये येणारा प्रकाश अधिक असू शकतो. शटर अधिक काळ उघडे राहिले तर अधिक तीव्रतेने आत येणाऱ्या प्रकाशानेही रंगाचा बेरंग होण्याचा धोका असतोच. म्हणजे अनेकदा रंगच बदललेले दिसतात. त्यामुळेच फारसे प्रयोग न करता हात स्थिर ठेवून फोटो टिपणे हाच या मोडवरचा चांगला पर्याय आहे.

आणखी वाचा : नेटकऱ्यांना लगाम! आक्षेपार्ह विधानं, ट्रोलिंगवर आता इंस्टाची नजर

मोबाइलमध्ये AI
आपल्या मोबाइलमध्ये देखील कृत्रिम बुद्धीमत्ता एआय AI काम करत असते. फोटो टिपताना आजूबाजूचे सेटिंग- वातावरण किती काळोखे आहे, याचा अंदाज घेऊन त्यानुसार इतर बाबी या मोडवर अॅडजस्ट केल्या जातात. एकाच वेळेस टिपलेले अनेक फोटो एकत्र करतानाही हे AI काम करत असते.

आणखी वाचा : AI एआयला तुमच्याआधीच कळतं की, विमानतिकिटासाठी तुम्ही किती पैसे मोजायला तयार आहात!

नाईट मोडवर वेळ अधिक
एरवी क्लिक केले की, समोर फोटो हजर असतो. असे नाईट मोडवर होत नाही, हेही लक्षात घ्या. अनेक फोटो एकत्र करून त्यातील उत्तम जोडकाम करत फोटो तुमच्यासमोर यायला एरवीपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो. पण समोर येणारा फोटो अधिक चांगला असतो, हे लक्षात असू द्यात. त्यामुळे या मोडवर काम करताना अधिक संयम ठेवा…
चला, तर मग… सज्ज व्हा कमी प्रकाशातील छान फोटो दिवाळीत टिपायला!

Story img Loader