How to connect smartphone to tv : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवणाचा अविभाज्य घटकच झाला आहे. काहींना त्याच्याशिवाय राहावतच नाही. मनोरंजन, कॉलिंग, मेसेज पाठवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. स्मार्टफोनवर तुम्ही कुठेही आणि कधीही युट्यूबवरील व्हिडिओ, चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. मात्र तुम्हाला स्मार्टफोनवरील व्हिडिओ, फोटो टीव्हीवर पाहायचे असतील तर पर्याय आहे. कोणताही केबल न जोडता वायरलेस पद्धतीने तुम्ही आपला मोबाईल टीव्हीला कनेक्ट करू शकता.

फोन वायरलेस पद्धतीने टीव्हीशी कसा जोडायचा?

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thoda Tuza Ani Thoda Maza fame Sameer Paranjape propose to Shivani surve on aata hou de dhingana season 3
Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
mukta barve entry in colors marathi serial
Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

तुम्ही पुढील तीन पद्धतीने तुमचा स्मार्टफोन टीव्हीशी जोडू शकता.

  • क्रोमकास्ट
  • एअरप्ले
  • MHL/SLHDMI केबलचा वापर

१. क्रोमकास्ट

क्रोमकास्ट हे एक उपकरण असून तुम्ही ते टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडू शकता. एकदा कनेक्ट झाल्यावर तुम्ही या उपकरणाद्वारे स्मार्टफोनवरील कंटेट टीव्हीवर पाहू शकता. हा लहान आणि कॉम्पॅक्ट डिव्हाइस असून त्यास टीव्हीला जोडणे आणि वापरणे अतिशय सोपे आहे.

(..म्हणून कदाचित IPHONE 15 मध्ये USB TYPE C CHARGER मिळणार नाही)

असे वापरा

  • क्रोमकास्ट उपकरणाला टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडा. यादरम्यान फोन आणि टीव्ही एकाच वायफाय नेटवर्कला कनेक्ट असयला हवेत.
  • टीव्हीवर युट्यूब व्हिडिओ पाहायचा असल्यास युट्यूब अ‍ॅप फोनवर सुरू करा.
  • अ‍ॅपमध्ये कास्ट आयकन पाहा. हे आयकन कोपऱ्यात वायफाय चिन्हासह लहान आयतासारखे दिसते. अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी त्यावर टॅप करा.
  • पर्यायांच्या सूचीमधून तुमचा शॉपिंग मोड क्रोमकास्ट डिव्हाइस निवडा. नंतर कंटेट टीव्हीवर प्ले होईल.

२. एअरप्ले

एअरप्ले हे फीचर सर्व अ‍ॅपल उपकरणांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा वापर आयफोन आणि आयपॅडवरील कंटेट टीव्हीवर पाहण्यासाठी करता येतो. तुमच्याकडे अ‍ॅपल टीव्ही असल्यास तुम्ही एअरप्लेचा वापर करून कोणत्याही केबलशिवाय फोनला टीव्हीशी कनेक्ट करू शकता.

(‘हे’ अ‍ॅप सेल्फीला देते पेंटिंगसारखा लूक; कुठेही अपलोड केल्यावर व्हाल लोकप्रिय, असा करा वापर)

  • फोन आणि टीव्ही एकाच वायफाय नेटवर्कला जोडलेले आहेत की नाही याची खात्री करा.
  • तुम्हाला जो अ‍ॅप कास्ट करायचा आहे त्यास फोनवर सुरू करा. उदाहरण, टीव्हीवर युट्यूब व्हिडिओ पाहायचा असल्यास आयफोनवर युट्यूब अ‍ॅप सुरू करा.
  • अ‍ॅपमध्ये एअरप्ले आयकन शोधा. हे आयकन कोपऱ्यात त्रिकोनासह छोट्या आयातासारखे दिसते. अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी त्यावर टॅप करा.
  • डिव्हाइसेसच्या सुचींमधून अ‍ॅपल टीव्ही निवडा.
  • नंतर टीव्हीवर कंटेट सुरू होईल.

३. MHL/SLHDMI केबल

तुमच्याकडे क्रोमकास्ट किंवा अ‍ॅपल टीव्ही नसल्यास तुम्ही केबलद्वारे फोनला टीव्हीशी कनेक्ट करू शकता. यासाठी तुमच्याकडे एमएचएल किंवा एसएलएचडीएमआय केबल असणे आवश्यक आहे. हे केबल सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध आहे. यामध्ये आयफोन, सॅमसंग आणि सोनीचा देखील समावेश आहे. एमएचएल केबल नवीन आणि जुन्या टीव्ही मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये एचडीएमआय पोर्ट नसल्यास तुम्ही फोन कनेक्ट करण्यासाठी एमएचएल केबलचा वापर करू शकता.

(‘हे’ आहेत २०२२ वर्षातील BEST CAMERA SMARTPHONES; यादीवर टाका एक नजर)

  • MHL/SLHDMI केबलचा एक टोक फोनला कनेक्ट करा आणि दुसरा टोक टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला कनेक्ट करा.
  • टीव्ही सुरू करा आणि योग्य इनपूट सोर्स निवडा.
  • आता फोनवरील कंटेट तुमच्या टीव्हीवर प्ले होईल.

काय आहे स्क्रीन मिररींग?

स्क्रीन मिररींग हे स्मार्टफोनमधील फीचर आहे ज्यामुळे फोनमधील कंटेट वायरलेस पद्धतीने टीव्हीवर पाहता येते. मोठ्या स्क्रीनवर फोटो पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी आणि चित्रपट पाहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. तुमचा फोन आणि टीव्ही हे एकाच वायफायला जोडलेले असावेत आणि तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये क्रोमकास्ट किंवा स्क्रीन मिररींगला सपोर्ट करणारे स्ट्रिमिंग डिव्हाइस असावे.