ChatGpt हा चॅटबॉट ओपनएआयने नोंव्हेंबर २०२२ मध्ये लॉन्च केला आहे. सध्या सर्वत्र याचा वापर सुरू आहे. अनेक ठिकाणी chatgpt वापरले जात आहे. हा एक कृत्रिम AI आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.OpenAI ने अलीकडेच ChatGpt – 4 लॉन्च केले आहे. जे आधीच्या चॅटबॉटपेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा केला जात आहे.
चॅटजीपीटीमध्ये तुमची chat हिस्ट्री रेकॉर्ड केली जाते. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चॅटबॉटचा वापर कसा केला ही माहिती होण्यासाठी ती हिस्ट्री तुम्हाला मदत करते. मात्र हा डेटा लीक होऊ शकतो अशी भीती देखील वापरकर्त्यांना आहे. आज आपण chatgpt मधील चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची याबद्दल जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : गुगलने Gmail साठी लॉन्च केली ‘Blue Tick’ सर्व्हिस, मात्र ट्विटर, फेसबुकप्रमाणे…
चॅटजीपीटी हिस्ट्री कशी पाहावी ?
१. सर्वात पहिल्यांदा कोणत्याही ब्राउझरवर ChatGPT उघडा आणि OpenAI अकाऊंटने लॉग इन करा.
२. एकदा तुम्ही लॉग इन केले तुम्ही तिथे असणाऱ्या साइडबारवर हिस्ट्री पाहू शकता.
ChatGpt हिस्ट्रीमधून पर्सनल chats कसे डिलीट करायचे ?
१. सर्वात पहिल्यांदा ChatGpt ओपन करा आणि लॉग इन करा.
२. एकदा तुम्ही लॉग इन केले तुम्ही तिथे असणाऱ्या साइडबारवर हिस्ट्री पाहू शकता.
३. त्यानंतर तुम्हाला डिलीट करायचे असलेले चॅटवर माऊस धरा आणि Trash पर्यायावर क्लिक करा.
४. चॅट हिस्ट्री डिलीट करण्यासाठी क्रॉस मार्क यावर क्लिक करा.
नवीन टेक स्टार्टअप OpenAI ने ChatGPT Plus ची घोषणा केली आहे. AI चॅटबॉट चॅटजीपीटीसाठी पेड सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे. या नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅनमुळे वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली आणि वेगवान सेवा मिळेल. AI चॅटबॉट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच लॉन्च करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याची सतत चर्चा सुरु आहे.