Internet Speed Test: कोविडनंतर, बहुतेक लोक घरून काम करत आहेत, अशा परिस्थितीत इंटरनेट वापरणारे लोक वेग कमी झाल्यानंतर खूप अस्वस्थ होतात. शेवटी, काय प्रॉब्लेम आहे हे शोधण्यासाठी कस्टमर केअरकडे वेळ घालवतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही गुगलच्या माध्यमातून तुमचा इंटरनेट स्पीड तपासू शकता. आपण डाउनलोड आणि अपलोड गती जाणून घेऊ शकता.
अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या इंटरनेटचा वेग सांगतात. शिवाय अनेक अॅप्स आहेत, जे इंटरनेट स्पीड टेस्ट करून सांगतात. तुम्ही गुगलवर सर्च करून वेबसाईटद्वारे इंटरनेट स्पीड देखील तपासू शकता. गुगलने M-Lab सोबत भागीदारी केली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पीड टेस्ट करू शकता.
(हे ही वाचा: तुमचे WiFi कनेक्शन स्लो होत आहे का? जाणून घ्या कारण आणि महत्त्वाच्या गोष्टी)
तुम्ही ‘याप्रमाणे’ इंटरनेट स्पीड करू शकता टेस्ट
१. सर्वप्रथम तुम्हाला डिव्हाइसवर google.com उघडावे लागेल.
२. त्यानंतर तुम्हाला गुगलवर Run Speed Test हे सर्च करावे लागेल.
३. पेजवर तुम्हाला एक बॉक्स दिसेल, ज्यामध्ये तुम्ही ३० सेकंदात तुमचा इंटरनेट स्पीड तपासू शकता असे लिहिले आहे.
४. तुम्हाला त्या बॉक्सच्या तळाशी असलेल्या रन स्पीड टेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
५. क्लिक केल्यावर, तुम्हाला एक पॉप-अप दिसेल, जिथे तुम्हाला परिणाम दिसतील.