परमनंट अकाउंट नंबर किंवा पॅन कार्ड हे आज खूप महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. आर्थिक सेवांचा लाभ घेण्यापासून ते आयकर विवरणपत्र भरण्यापर्यंत सर्वत्र याची गरज आहे. पॅनशिवाय तुम्ही सामान्य बँक खातेही उघडू शकत नाही. कोणत्याही आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक त्याशिवाय होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे पॅनकार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्रे हरवली तर खूप समस्या निर्माण होऊ शकतात.
पण काळजी करण्यासारखे काही नाही. इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड किंवा ई-पॅन कार्ड ही समस्या दूर करेल. बहुतांश वित्तीय संस्था ई-पॅन कार्ड स्वीकारतात. तुम्ही तुमच्या फोनमध्ये ई-पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता आणि ते खूप सोयीचेही आहे. दोन पानांचा फॉर्म (पॅन कार्ड फॉर्म) भरण्याऐवजी, तुम्ही फक्त १० मिनिटांत नवीन पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमची आधार आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
पॅन कार्ड हा आयकर विभागाने जारी केलेला १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. दुसरीकडे, ई-पॅन हे व्हर्च्युअल पॅन कार्ड आहे जे आवश्यक असल्यास कुठेही ई-पडताळणीसाठी वापरले जाऊ शकते.
पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
सर्वात आधी http://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वेबसाइटवर जा.
त्यानंतर डाउनलोड ई-पॅन या पर्यायावर क्लिक करा.
इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकण्यासाठी सांगितलं जाईल.
पुढे आधार क्रमांक द्यावा लागेल.
त्यानंतर जन्मतारीख टाकावी लागेल. पुढे नियम आणि अटी स्वीकाराव्या लागतील.
अटी आणि नियम स्वीकारल्यानंतर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकून पुढील प्रोसेस करा.
आता पेमेंट करण्यासाठीचा पर्याय पॉप-अप होईल.८.२६ रुपये पेमेंट करावं लागेल. हे पेमेंट UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने करता येतं.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर e-PAN Card डाउनलोड करू शकता.
महत्त्वाची बाब म्हणजे पॅन कार्डची PDF फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.