दिवाळी निमित्त लोक मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा मेसेज पाठवतात. यासाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यातील स्माइली, स्टिकर्स हे मेसेज अधिक प्रभावीपणे व्यक्त करतात. पण एकच एक स्टिकर पाठवून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुम्ही काहीतरी वगळं शोधत असाल तर इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपने युजरसाठी अनेक स्टिकर आणि स्टिकर पॅक उपलब्ध केल आहेत. विविध प्रकारचे अनेक नवे स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्ही ते दिवाळी निमित्त मित्रांना मेसेज करू शकता. हे स्टिकर पुढील प्रमाणे तुम्ही डाऊनलोड आणि सेंड करू शकता.
(फोन मधील बॅटरी लवकर संपते का? मग ‘हे’ अॅप्स तातडीने काढा, गुगलनेही प्लेस्टोअरवरून हटवलेत)
असे डाऊनलोड करा स्टिकर
- सर्वात आधी फोनवर त्या कॉन्टॅक्टला निवडा ज्याला तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टिकर पाठवायचे आहे.
- आता टेक्स्ट बॉक्सच्या डाव्या बाजूला देण्यात आलेल्या स्मायलीवर टॅप करा.
- त्यानंतर जीआयएफ आयकनच्या उजव्या बाजूला देण्यात आलेल्या स्टिकर आयकनवर टॅप करा.
- जर तुम्ही आधीच स्टिकर डाऊनलोड केले असेल तर जे स्टिकर पाठवायचे आहे त्यास टॅप करा. जर तुम्ही स्टिकर डाऊनलोड नसेल केले तर तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
- स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी स्टिकर सेक्शनवरील उजव्या बाजूला देण्यात आलेल्या ‘+’ चिन्हावर टॅप करा.
- तुम्हाला आवडो तो स्टिकर पॅक सिलेक्ट करा.
- स्टिकर पॅक डाऊनलोड करण्यासाठी पॅकच्या बाजूला देण्यात आलेल्या डाऊनलोड आयकनवर टॅप करा.
- डाऊनलोड झाल्यावर स्टिकर पॅक तुम्हाला स्टिकर टॅबमध्ये दिसून येईल. यातून आवडते स्टिकर सिलेक्ट करून तुम्ही ते सेंड करू शकता.
- स्टिकर पॅक डिलिट करणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला माय स्टिकरवर जाऊन डिलिट बटनवर टॅप करावे लागेल.