ChatGPT अँड्रॉइड अ‍ॅप आता भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. आधी हे केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. आता अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून चॅटजीपीटी विनामूल्य डाउनलोड करू शकतात. वेब व्हर्जनप्रमाणेच वापरकर्ते संभाषणात्मक उत्तर मिळविण्यासाठी एआय-सक्षम चॅटबॉटला कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारू शकतात. वापरकर्ते विशिष्ट प्रॉम्प्ट वापरून प्रतिसादाचा टोन आणि शैली देखील बदलू शकतात. मोबाइल अॅपच्या फायद्यात इंटरनेट नसतानाही जुन्या चॅटमध्ये प्रवेश करणे समाविष्ट आहे. OpenAI ने ChatGPT ची ऑफलाइन आवृत्ती आणल्यास भविष्यातही ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

ओपनएआयने केलेल्या ट्विटमध्ये अँड्रॉइड अॅपच्या रोलआउटची घोषणा केली. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ”Android साठी ChatGPT आता अमेरिका, भारत, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. आम्ही पुढील आठवड्यात अतिरिक्त देशांमध्ये रोलआउटचा विस्तार करण्याची योजना आखत आहोत.”

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
PM Modi-Omar Abdullah
PM Modi-Omar Abdullah : PM मोदी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यातील मैत्री वाढली? झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनावेळी नेमकं काय घडलं?
Amit shah fadnavis
अमित शाह यांचा ठाकरे व शरद पवार गटावर हल्लाबोल; जुन्या मित्रांसाठी भाजपाचे दरवाजे बंदच, पक्षाची भूमिका स्पष्ट
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

हेही वाचा : Vodafone Idea च्या ‘या’ फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये ७० जीबी डेटासह मिळणार…

OpenAI द्वारे नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले आहे. हे एक भाषेवर आधारित चॅटबॉट आहे. तो आपल्या हव्या असणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देतो. कविता, निबंध लिहून देतो. चॅटजीपीटीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ते लॉन्च झाल्यापासून चार महिन्यांमध्ये कमीत कमी वेळेत १०० मिलियन युजर्स होणारे ते सर्वात वेगवान अँप्लिकेशन बनले आहे. हे GPT-3.5 आणि GPT-4 वर तयार केले आहे. सध्या आत्तापर्यंत, GPT-4 फक्त ChatGPT Plus सदस्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना भारतात महिन्याला मेंबरशिपसाठी १,९९९ रुपये द्यावे लागतील.

अँड्रॉइडवर ChatGpt कसे डाउनलोड करायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करावे.

२. तिथे चॅटजीपीटी सर्च करावे.

३. तिथे तुम्हाला या Apps दिसतील.

४. त्यामध्ये तुम्ही डाऊनलोड करताना वापरकर्त्यांनी अधिकृत वितरक किंवा विकसक – OpenAI शोधणे आवश्यक आहे.

५. एकदा का App डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड आयडीने लॉग इन करावे.

६. तसेच चॅटजीपीटीवर नवीन असल्यास तुमच्या Apple किंवा Google ID सह साइन अप करू शकता.

Story img Loader