ट्विटरवर रोज विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर होत असतात. रोचक, आश्चर्यकारक व्हिडिओंमुळे युजरचे मनोरंजन होते, तसेच त्यांना माहिती देखील मिळते. मात्र, हे व्हिडिओ हवे असल्यास त्यांना ट्विटरवरून डाऊनलोड करता येत नाही. तुम्ही त्यांना केवळ शेअर करू शकता. पण, तुम्हाला ट्विटरवरील व्हिडिओ पाहिजेच असेल तर तुम्ही थर्ड पार्टी अॅपच्या सहायाने व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. हे कसे करता येईल याबाबत जाणून घेऊया.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अँड्रॉइड डिव्हाइसवर असे डाऊनलोड करा व्हिडिओ
- ट्विलोड अॅप डाऊनलोड करा.
- तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ ज्या ट्विटमध्ये आहे तो ट्विट शोधा आणि शेअर आयकनवर टॅप करून ‘कॉपी लिंक’ निवडा.
- लिंक कॉपी केल्यानंतर ट्विलोड उघडा. ट्विलोडच्या वरच्या भागात टेक्स्ट फिल्डमध्ये यूआरएल पेस्ट करा. यासाठी ब्ल्यू क्लिपबोर्ड आयकन वापरा.
- आता डाऊनलोड बटनवर टॅप करा.
- डाऊनलोड बटनवर टॅप केल्यानंतर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल. येथून तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच, डाऊनलोड केलेला व्हिडिओ शोधण्यासाठी तुम्ही वरच्या उजव्या कोपऱ्यातील डाऊनलोड चिन्हावर देखील क्लिक करू शकता.
आयओएस डिव्हाइसवर असे डाऊनलोड करा व्हिडिओ
- शॉर्टकट्स अॅप डाऊनलोड करा.
- त्यानंतर आयओएस डिव्हाइमधील सेटिंग अॅप उघडा आणि लिस्टमध्ये शॉर्टकट्स अॅप मिळेपर्यंत खाली स्क्रॉल करत राहा.
- शॉर्टकट्स अॅपवर टॅप करा आणि त्यास टॉगलिंग करून ऑन करत ‘अलो अनट्रस्टेड शॉर्टकट’ची परवानगी द्या.
- लिंक ओपन करून ‘गेट शॉर्टकट’वर क्लिक करा.
- ट्विटर व्हिडिओ डाऊनलोडरसाठी असलेले डाऊनलोड शॉर्टकट शॉर्टकट्स अॅपमध्ये उघडेल.
- स्क्रॉल डाऊन करून ‘अॅड अन्ट्रस्टेड शॉर्टकट’वर टॅप करा.
- त्यानंतर ट्विटर ओपन करा आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ ज्या ट्विटमध्ये आहे तो ट्विट शोधा.
- शेअर आयकनवर क्लिक केल्यावर ‘ट्विटर व्हिडिओ डाऊनलोडर’ हा नवा पर्याय दिसून येईल. हा पर्याय निवडा.
- यानंतर शॉर्टकट लाँच होईल आणि तुम्हाला व्हिडिओ क्वालिटीबाबत विचारले जाईल.
- डाऊनलोड झालेला व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये दिसून येईल.
First published on: 31-10-2022 at 17:17 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to download twitter videos on android and ios devices ssb