How To Auto Enable Archive Unused Apps : बहुतेक स्मार्टफोन आता १२८ जीबी (128GB) स्टोरेजसह येतात. पण, स्मार्टफोनमधील हे स्टोरेज महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ, फाईल्सने लगेच भरून जातात. पण, आपण सहसा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा स्टोरेज भरलेले असते, तेव्हा तुम्हाला ईमेल पाठवण्यात, गूगल फोटोजमध्ये एखादा फोटो निवडण्यास अडथळा निर्माण होतो. मग तेव्हा आपण नको असलेले फोटो, व्हिडीओ, फाईल्स डिलीट करण्यास सुरुवात करतो (Auto Archive Unused Apps).
पण, फोनमधील स्टोरेजची समस्या सोडवण्यासाठी आम्ही एक खास युक्ती घेऊन आलो आहोत. ॲण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अनेक नको असलेले ॲप्सदेखील जास्त स्टोरेज फूल होण्यास कारणीभूत असतात. अनेक इन्स्टॉल केलेले ॲप्स फोनमधील महत्वाची जागा व्यापून घेतात. यातील असे अनेक ॲप्स असतात जे आपण इन्स्टाल करतो, पण त्याचा वापर करतच नाही.
तर ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी, Google ने एक फीचर सादर केले आहे, जे न वापरलेले ॲप्स आपल्या फोनवरून अर्काइव्ह (archives) करतात (Auto Archive Unused Apps) आणि स्मार्टफोनमधील जागा मोकळी करतात. न वापरलेले ॲप्सचे चिन्ह, युजर डेटा आणि बेसिक फंक्शनलिटी इन्टॅक्टसह युजर्स रिमूव्ह करू शकतात. जेव्हा डिव्हाइसचे स्टोरेज कमी असेल तेव्हा तुम्ही ते पुन्हा ऑटो-अर्काइव्ह करू शकता.
तर या फीचरचा वापर कसा करायचा चला पाहू (Auto Archive Unused Apps)
- मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जा.
- प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- त्यानंतर सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
- सगळ्यात वर असणाऱ्या General वर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करा आणि Automatically Archive Apps ऑन करा.
एकदा तुम्ही हे फीचर एनेबल केले की, तुमच्या फोनवरील न वापरलेले ॲप्स अर्काइव्ह केले जातील. कोणतीही महत्त्वाची फाईल डिलीट न करता तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज अगदी सोप्या पद्धतीने खाली करू शकता.