How to spot Fake profiles on dating apps : भारतात बरेच लोक जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्सचा उपयोग करतात. या डेटिंग अ‍ॅप्समुळे जोडीदार शोधणे खूपच सोपे झाले आहे. पण, या ॲप्सवर तुमच्याशी बोलणारी प्रत्येक व्यक्ती खरी असते का? तर नाही… कारण अनेक जण अशा डेटिंग ॲप्सवर खोटे किंवा बनावट प्रोफाइल ( Fake profiles ) किंवा आयडी तयार करतात आणि तुमच्याकडून पैसे काढून घेण्याचाही प्रयत्न करतात, त्यामुळे आजच्या घडीला ही एक मोठी समस्या ठरते आहे. पण, ज्युलिओने YouGov बरोबर केलेल्या पार्टनरशिपच्या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, अशा प्लॅटफॉर्मवर सुमारे ७८ टक्के महिलांना असे बनावट प्रोफाइल आढळून येतात. यावर उपाय म्हणून अनेक प्रयत्न याआधीही करण्यात आले आहेत. पण, जोपर्यंत तुम्हाला ॲप्सवरील बनावट प्रोफाइल कसे ओळखायचे हे कळत नाही, तोपर्यंत ही समस्या कधीही संपणार नाही.

तर डेटिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइल (Fake profiles) शोधण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे आहेत…

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर स्विच करणे :

Lord Surya Dev Favorite Zodiac Sign
Lord Surya Dev Favorite Zodiac: सूर्यदेवाला खूप प्रिय आहेत या तीन राशी, कमी वयात कमावतात पैसा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
astrology People of these four signs are very spendthrift
‘या’ चार राशींचे लोक असतात खूप जास्त खर्चिक, पाण्यासारखा खर्च करतात पैसा
mangal gochar 2024 mars transit in kark made dhan lakshmi rajyog
मंगळ ग्रहाने निर्माण केला धनलक्ष्मी राजयोग! ‘या’ राशींचे नशीब चमकणार, अनपेक्षित धनलाभाचा योग
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

बनावट प्रोफाईलचे सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्याशी डेटिंग ॲप्सवर बोलण्यास सुरुवात तर करते, पण हळूहळू संवाद वाढवून तुम्हाला दुसऱ्या ॲपवर स्विच होण्याससुद्धा सांगते. त्यासाठी तुमचा फोन नंबर, पत्ता इत्यादी वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करते.

जास्त चांगल्या प्रोफाइलपासून दूर राहा :

काही व्यक्ती अशा असतात, जे तुमच्या भावना समजून घेण्यासाठी तुमच्याशी गोडगोड बोलतात. त्यामुळे असे प्रोफाइल्स वा आयडी तुम्हाला खऱ्या वाटू लागतात. तर अशावेळी तो प्रोफाइल बनावट ( Fake profiles ) आहे की नाही ओळखण्यासाठी ते सुरुवातीपासूनच तुमची काळजी घेणारे, तुमचा विचार करणारे आणि संरक्षण करणारे आहेत का हे एकदा नक्की तपासून पाहा.

हेही वाचा…Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या

भेटण टाळणे :

जर डेटिंग ॲपवर एखाद्या व्यक्तीशी तुमचे प्रोफाइल जुळत असेल, पण ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर ते बनावट प्रोफाइल असू शकते. भेटण्यापेक्षा त्याला/तिला तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे असे ती वारंवार म्हणताना दिसते; त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे.

प्लॅन्स वारंवार रद्द करणे :

स्कॅमर सहसा तुम्ही बनवलेला एखादा प्लॅन टाळतात, तर कधी कधी तेच प्लॅन बनवतात आणि नंतर काही कारणांमुळे शेवटच्या क्षणी मुद्दाम रद्द करतात. तेव्हा तुम्हाला संशय आला पाहिजे आणि हा आयडी बनावट आहे, हे लक्षात आले पाहिजे.

सतत आर्थिक मदत मागणे :

हे कदाचित बनावट प्रोफाइलचे सर्वात मोठे लक्षण आहे. घोटाळेबाजांना सहसा आर्थिक फायदा मिळवायचा असतो. हे करण्यासाठी त्यांना शक्य तितक्या लवकर एखाद्याशी नाते जोडायचे असते. एकदा का आपण त्यांच्या जाळ्यात अडकलो की ते नंतर आपल्याकडे आर्थिक मदत मागण्यास सुरुवात करतात.

सुरुवातीलाच वैयक्तिक प्रश्न विचारणे :

काही जण अगदीच फ्रेंडली होऊन पत्ता , आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींबद्दल माहिती तुम्हाला विचारण्यास सुरुवात करतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रोफाइलपासून वेळीच सावध व्हा.

तर अशाप्रकारे तुम्ही प्रोफाइल किंवा आयडी बनावट (Fake profiles )आहे हे ओळखू शकता.