How to spot Fake profiles on dating apps : भारतात बरेच लोक जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्सचा उपयोग करतात. या डेटिंग अॅप्समुळे जोडीदार शोधणे खूपच सोपे झाले आहे. पण, या ॲप्सवर तुमच्याशी बोलणारी प्रत्येक व्यक्ती खरी असते का? तर नाही… कारण अनेक जण अशा डेटिंग ॲप्सवर खोटे किंवा बनावट प्रोफाइल ( Fake profiles ) किंवा आयडी तयार करतात आणि तुमच्याकडून पैसे काढून घेण्याचाही प्रयत्न करतात, त्यामुळे आजच्या घडीला ही एक मोठी समस्या ठरते आहे. पण, ज्युलिओने YouGov बरोबर केलेल्या पार्टनरशिपच्या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, अशा प्लॅटफॉर्मवर सुमारे ७८ टक्के महिलांना असे बनावट प्रोफाइल आढळून येतात. यावर उपाय म्हणून अनेक प्रयत्न याआधीही करण्यात आले आहेत. पण, जोपर्यंत तुम्हाला ॲप्सवरील बनावट प्रोफाइल कसे ओळखायचे हे कळत नाही, तोपर्यंत ही समस्या कधीही संपणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा