How To Find Wi-Fi Password : अगदी मोबाईलच्या लॉक स्क्रीनपासून ते अगदी क्रेडिट कार्डपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड हा लागतोच. पण, इतके सगळे पासवर्ड लक्षात कसे ठेवायचे, असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो. कधी कधी तुमच्या घरी पाहुणे राहायला आले आणि त्यांनी तुम्हाला “तुमच्या वाय-फायचा पासवर्ड काय आहे,” असं विचारलं तर आपण गोंधळात पडतो. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवरून विसरलेला Wi-Fi पासवर्ड सोप्या पद्धतीनं कसा मिळवावा (How To Find Wi-Fi Password) याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

ॲण्ड्रॉईड

तुमच्याकडे Google Pixel फोन असल्यास, सेटिंग्ज ॲड नेटवर्कमध्ये जाऊन इंटरनेटवर क्लिक करा. तुमचा फोनमध्ये आधीपासून कनेक्ट केलेल्या वाय-फाय नेटवर्कच्या नावापुढे दिसणाऱ्या गियर आयकॉनवर क्लिक करा. ते तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर घेऊन जाईल. ‘शेअर करा’वर टॅप करा आणि तुमची ओळख पटवून द्या. त्यानंतर तुम्हाला वाय-फाय पासवर्डसह लॉगिन डिटेल्स शेअर करण्यासाठी एक क्यूआर कोड दाखवला जाईल.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
TRAI New Rule, Jio, Airtel, Vi customers
TRAI New Rule : Jio, Airtel आणि Vi ग्राहकांचे ‘या’ तारखेपासून वाढणार टेन्शन! OTP बाबतच्या नियमात केला मोठा बदल

जर तुमच्याकडे सॅमसंग गॅलॅक्सी असेल, तर सेटिंग्जमध्ये जा. तिथे कनेक्शनमध्ये जाऊन वाय-फाय उघडा. कनेक्ट केलेल्या Wi-Fi नेटवर्कच्या पुढील गियर आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर starred-out password field च्या पुढील eye icon वर क्लिक करा आणि तुमची ओळख स्पष्ट करा. त्यामुळे Wi-Fi पासवर्ड साध्या शब्दांत तुम्हाला दिसेल.

हेही वाचा…Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

Wi-Fi कॉन्फिगरेशन पेज इतर कोणत्याही प्रकारच्या Android फोनवरदेखील ठेवता येऊ शकते. तुमच्या डिव्हाइसला वाय-फाय नेटवर्कशी ऑटोमॅटिकली पुन्हा कनेक्ट करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये ते उपयुक्त ठरू शकते.

iPhones साठी प्रोसेस अगदी सोपी आहे. मेन सेटिंग्ज ॲपवर जा. Wi-Fi वर क्लिक करा आणि तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट केले आहे, त्या नेटवर्कच्या पुढे असलेल्या निळ्या रंगाच्या इनसर्कलवर टॅप करा. Password वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा iPhone पासकोड किंवा Face ID वापरून ओळख पटविण्यासाठी विचारला जाईल. हा पिन एंटर केल्याने किंवा फोन तुमच्या चेहऱ्यासमोर ठेवलात की, पासवर्ड रिव्हील केला होईल.

विंडोज

विंडोज लॅपटॉप, पीसीवरून तुमचा Wi-Fi पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी (How To Find Wi-Fi Password) सेटिंग्जमध्ये जा. नंतर स्टार्ट मेन्यूवर जाऊन नेटवर्क आणि इंटरनेटवर जा. नंतर Wi-Fi वर जा. तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट केलेले आहे, त्याचे नाव टॉपला दिसेल. वाय-फाय नेटवर्कच्या प्रॉपर्टीज पाहण्यासाठी नावावर टॅप करा. त्यानंतर एक नवीन स्क्रीन दिसेल, जी तुम्हाला वाय-फाय नेटवर्कबद्दल अतिरिक्त माहिती देईल. जसे की, प्रोफाइल टाईप, डीएनएस, आयपी सेटिंग्ज इत्यादी. वाय-फाय सिक्युरिटी की बघा आणि ‘View’वर क्लिक करा. त्यामुळे एक नवीन डायलॉग बॉक्स उघडेल; ज्यामध्ये Wi-Fi पासवर्ड साध्या शब्दात दिसेल.

मॅक (macOS)

तुमच्या macOS डिव्हाइसवर स्टोअर केलेला वाय-फाय पासवर्ड जाणून घेण्यासाठी (How To Find Wi-Fi Password) पुढील स्टेप्स फॉलो करा. सिस्टीम सेटिंग्जवर क्लिक करून, वाय-फायवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करून, Known Networks वर क्लिक करा. दुसऱ्या लिस्टमधील तीन डॉटवर क्लिक करून, कॉपी पासवर्डवर टॅप करा. नोट्स किंवा पेजेस ॲपवर जा आणि पासवर्ड प्लेन टेक्स्टमध्ये पेस्ट करण्यासाठी Command+V दाबा.