सध्या सर्वत्र नाताळची तयारी सुरू आहे. नाताळनिमित्त वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर मिळणारी सुट, वेगवेगळ्या ऑफर्स यांसाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता असते. यानिमित्त अनेक अॅपवरही अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. तर काही अॅप्समध्ये ख्रिसमस थीमवर आधारित आयकॉन किंवा इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात येतात. असाच बदल व्हॉटसअॅपवरही आता उपलब्ध झाला आहे. व्हॉटसअॅपवर आयकॉनवर ख्रिसमसची टोपी मिळवता येणार आहे.
काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही व्हॉटसअॅप आयकॉनवर ख्रिसमसची टोपी मिळवू शकता. अँड्रॉइड फोनमध्ये लाँचर्सचा वापर करून अॅप आयकॉनमध्ये बदल करता येतो, यातीलच एक लोकप्रिय लाँचर ‘नोवा लाँचर’चा वापर करून तुम्ही व्हॉटसअॅप आयकॉनवर ख्रिसमसची टोपी मिळवू शकता.
आणखी वाचा: WhatsApp वर आता मेसेजसाठीही होणार View Once सुविधा उपलब्ध; लगेच जाणून घ्या
पुढील स्टेप्स वापरून व्हॉटसअॅप आयकॉनवर मिळवा ख्रिसमसची टोपी
- ख्रिसमस टोपी असणारा व्हॉटसअॅप आयकॉन कोणत्याही ब्राऊजरवरून डाऊनलोड करा.
- ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘नोवा लाँच’ इन्स्टॉल करा.
- फोनमध्ये लाँचर सुरू करा.
- व्हॉटसअॅप आयकॉनवर काही सेकंद क्लिक करा.
- मेन्युमधील एडिट पर्यायावर क्लिक करा.
- गॅलरीमधील ख्रिसमस टोपी असणाऱ्या व्हॉटसअॅप आयकॉनवर क्लिक करा.
- ‘सेव चेंजेस’ वर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही केवळ व्हॉटसअॅपच नाही तर इतर कोणत्याही अॅपचे आयकॉन बदलू शकता.