व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपण दिवसभरात कितीही व्यस्त असलो तरी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांशी संपर्कात असतो. व्हॉटसअ‍ॅपवरून मेसेज करणे, फाइल्स पाठवणे, कॉल – व्हिडीओ कॉल करणे अशा अनेक गोष्टी सहजरित्या करता येतात. त्यामुळे अनेकजण व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला प्राधान्य देतात. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. नुकतेच व्हॉटसअ‍ॅपकडुन काही नवे फीचर्स लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली. मेसेज एडीटिंग, १००० पेक्षा अधिक जणांचा ग्रुप तयार करता येणे असे काही नवे फीचर लाँच करणार आहे, हे फीचर एक ट्रिक वापरून तुम्हाला सर्वात आधी वापरता येऊ शकतात. काय आहे ही ट्रिक जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या स्टेप्स वापरून मिळवा व्हॉटसअ‍ॅपचे लेटेस्ट फीचर्स

  • व्हॉटसअ‍ॅपचे लेटेस्ट फीचर्स मिळवण्यासाठी अँड्रॉइड फोनमध्ये ‘गूगल प्ले स्टोर’मध्ये व्हॉटसअ‍ॅप सर्च करा.
  • तिथे व्हॉटसअ‍ॅप इन्स्टॉल करून त्या पेजच्या शेवटी असणाऱ्या ‘बीटा युजर बनण्याच्या’ (Become A Beta Tester) पर्यायावर क्लिक करा.
  • थोड्यावेळाने तुम्ही बेटा युजर झाल्याचा ‘You’re a beta tester for this app. Awesome!’ असा मेसेज दिसेल.
  • अशाप्रकारे ‘बेटा युजर’द्वारे तुम्हाला व्हॉटसअ‍ॅपचे लेटेस्ट फीचर सर्वात आधी वापरता येतील.
  • याचा आणखी एक पर्याय म्हणजे इन्स्टॉल करतानाच तुम्ही
  • व्हॉटसअ‍ॅपचे बेटा वर्जन डाउनलोड करू शकता त्यांनंतर बीकम अ बेटा टेस्टर > आय एम इन > जॉईन हा पर्याय निवडा.