Gmail Tips : जीमेल हे कामानिमित्त दररोज वापरले जाणारे महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहे. जीमेल हे पत्रव्यवहाराचे आधुनिक स्वरूप आहे. तसेच अनेक वेबसाईट्स आणि ॲप्समध्ये आपण जीमेलच्या माध्यमातून लॉगिन करतो. त्यामुळे त्यासर्व ॲप्स, वेबसाईटचे पासवर्ड, कामाचे लॉगइन आयडी, ऑफिसमधून शेअर करण्यात आलेले अधिकृत मेल अशी बरीच माहिती मेलमध्ये असते. पण जीमेल उघडल्यानंतर अनेकवेळा त्यामध्ये प्रमोशनल मेल, न्यूजलेटर अशा गोष्टींनी भरलेले दिसते. यामध्ये महत्त्वाचे मेल्स सापडत नाहीत किंवा स्किप होण्याची शक्यता असते. अशा स्पॅम मेल्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सेटींग्स वापरून एकाचवेळी सर्व स्पॅम मेल्स डिलीट करू शकता. कोणत्या आहेत त्या स्टेप्स जाणून घ्या.
अनसबस्क्राईब आणि मास रिपोर्ट
- स्पॅम मेल्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अशा मेल्सना अनसबस्क्राईब आणि मास रिपोर्ट करू शकता.
- यासाठी जीमेलमध्ये लॉग इन करून स्पॅम मेल निवडा. यामध्ये कोणताही महत्त्वाचा मेल निवडला जाणार नाही याची खात्री बाळगा.
- स्पॅम मेल निवडल्यानंतर ‘i’ आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर ‘ रिपोर्ट स्पॅम, रिपोर्ट स्पॅम अन सबस्क्राईब हे पर्याय दिसतील.
- त्यानंतर एक लिस्ट दिसेल, यामध्ये महत्त्वाचे अकाउंट्स नसतील तर स्पॅम रिपोर्ट करून अनसबस्क्राईब पर्याय निवडा.
- यानंतर या अकाउंट्सवरून तुम्हाला मेल येणार नाही.
WhatsApp Avatar Feature : व्हॉटसअॅपवर शेअर करता येणार ‘अवतार’! काय आहे नवे फीचर जाणून घ्या
स्पॅम मेल ओळखण्यासाठी फिल्टरचा वापर करा
- जीमेल उघडून त्यातील सर्च बॉक्सवर क्लिक करून प्रमोशनल ईमेल लिस्ट मधून अनसबस्क्राईब करा.
- त्यानंतर वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करुन या प्रकारच्या मेल्सना फिल्टर करण्याचा पर्याय निवडा.
- क्रिएट अ फिल्टर पर्याय निवडून या प्रकारचे मेल्स डिलीट करायचे असतील तर तो पर्याय निवडा. याव्यतिरिक्त ‘रीड लेबल’ हा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध होतो.