सध्या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळाचा तडाखा ज्या ठिकाणी बसेल किंवा ते ज्या भागातून जाणार आहे तेथील लोकांच्या जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो. जसे आपण पाहिले की रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे समुद्राचे पाणी तिथे असणाऱ्या दुकानांमध्ये शिरले होते. यावेळी आपल्या स्मार्टफोनवर हवामान कसे असेल याबाबत सूचना मिळाली तर त्याचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आज आपण iOS आणि Android डिव्हाईसवरील होम स्क्रीनवर वेदर विजेट्स कसे Add करायचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

आयओएस आणि अँड्रॉइडवर अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत. ज्यामध्ये आपल्याला वेदर अपडेट मिळू शकते. मात्र थर्ड पार्टी अ‍ॅप्स असले तरी या दोन्ही डिव्हाइसमध्ये इंटर्नल विजेट्स मिळतात जे अचूक आणि रिअल टाइम डेटा देत असतात. तुमच्या स्मार्टफोनवर वेगाने वेदर अपडेट्स मिळवण्यासाठी Android आणि iOS डिव्हाईसवर विजेट्स कसे सेट करायचे ते पाहुयात. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

हेही वाचा : Tech Gadgets: ५०० रुपयांच्या आतमध्ये खरेदी करता येणार ‘ही’ पाच गॅजेट्स, असा होतो उपयोग

जर का तुमच्याकडे ios १६ किंवा नवीन व्हर्जनवर चालणार आयफोन असेल तर होम स्क्रीनवर वेदर विजेट्स जोडण्यासाठी या सोप्या स्टेप्सचा वापर करा.

आयफोनवर वेदर अलर्ट कसे मिळवायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा होम स्क्रीनवर जाऊन लॉन्ग प्रेस करा.

२. त्यानंतर वरील बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये प्लस बटणावर क्लिक करा.

३. weather सर्च करा आणि होम स्क्रीनवर अ‍ॅड करावे.

आयफोनवरील वेदर विजेट्स सध्याचे तापमान आणि १० दिवसांचे अंदाज यासारखे डिटेल्स दाखवते.

हेही वाचा : Weekly Tech Updates: केरळने केलेल्या मोफत इंटरनेटच्या घोषणेपासून ते AI च्या मदतीने महिलेने तयार केलेल्या नवऱ्यापर्यंत, टेक क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर

Android डिव्हाईसवर वेदर अलर्ट कसे मिळवायचे ?

अँड्रॉइड फोनवर वेदर विजेट्स Add करणे प्रत्येक मॉडेलवर अवलंबून असते. मात्र ह्या स्टेप्स अनेक फोनवर सारख्या असू शकतात.

१. सर्वात पहिल्यांदा होम स्क्रीनवर लॉन्ग प्रेस करावे.

२. विजेट्स सिलेक्ट करावे.

३. वेदर सर्च करावे.

४. होम स्क्रीनवर Add करण्यासाठी लॉन्ग प्रेस करावे.

अँड्रॉइड फोनमध्ये वेदर विजेट्स सध्याचे तापमान, UV index, आणि आर्द्रता सारखे डिटेल्स दाखवते.

Story img Loader