स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण झाले आहे. अगदी सकाळच्या अलार्मपासून रात्री जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा झाली तर लगेच आपण मोबाईलवरून ऑर्डर करतो. बँकेचे व्यवहार, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन शॉपिंग किंवा ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे यांसाठी आपण अनेक अ‍ॅप डाऊनलोड करतो, पण त्यापैकी बरेचसे अ‍ॅप आपण काही दिवसांनंतर वापरत नाही, अशावेळी ते अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण अ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यास त्यावर शेअर करण्यात आलेला डेटाही डिलीट होण्याची भीती असते, त्यामुळे असे अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याऐवजी हाईड करू शकता म्हणजेच लपवू शकता. त्यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्टेप्स वापरून करा अ‍ॅप्स हाईड

आणखी वाचा : ‘ही’ ट्रिक वापरून पाहा गुपचूप Whatsapp Status; स्टेट्स ठेवणाऱ्या व्यक्तीलाही दिसणार नाही नाव

  • स्मार्टफोनवरील सेटींग्स पर्यायामध्ये जा
  • त्यामध्ये प्रायवसी टॅब उघडा.
  • प्रायवसी टॅबमधील हाईड अ‍ॅप्स पर्याय निवडा.
  • तिथे तुम्हाला प्रायवसी पासवर्ड विचारला जाईल, त्यानंतर तिथे अ‍ॅप्सची लिस्ट दिसेल, त्यापैकी कोणते अ‍ॅप्स हाईड करायचे आहेत ते निवडा.
  • हाईड केलेल्या अ‍ॅप्ससाठी पासवर्ड सेट करा, पासवर्ड सेट करताना नेहमी ‘#’ सुरूवातीला आणि शेवटी हे चिन्ह वापरा. या पासकोडमुळे तुम्हाला फोनमधील हाईड अ‍ॅप्स शोधण्यासाठी मदत होईल.
  • या स्टेप्स वापरून अ‍ॅप्स हाईड करता येतील. यानंतर जेव्हा तुम्हाला त्या अ‍ॅप्सवर जायचे असेल तेव्हा, फोन डायल पॅडवर हा पासवर्ड टाकू शकता.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to hide app on android smartphones without deleting it know easy steps pns
Show comments