प्रगत तंत्रज्ञानामुळे जशी व्यक्ती प्रगत होत गेली तसतसे तिला अशा चुकीच्या गोष्टी करण्याचे अनेक नवनवीन मार्ग खुले झालेले आहेत. अशातच, AI या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करून फोनवरूनच एखाद्याची फसवणूक केल्याबद्दल किंवा फेक/खोटा फोन करून व्यक्तीला गंडवल्याच्या बातम्या सध्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. मात्र, अशा या प्रगत AI च्या मागे लपून फसवणूक करणाऱ्यांना ओळखायचे कसे असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.

असे करणे कठीण असले तरीही अशक्य नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर जसे उत्तर असते तसे यावरही आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी त्यांच्याकडून लहान-लहान चुका या होत असतात. फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत. असे फ्रॉड, फेक फोन कॉल्स, AI च्या मदतीने आवाजाची नक्कल करून बोलणाऱ्या स्कॅमर्सना कसे ओळखायचे यांच्या काही टिप्स टाइम्स ऑफ इंडियाच्या लेखातून समजतात, त्या पाहा.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हेही वाचा : पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….

१. अचानक आलेले फोन

आपल्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींनी जर अचानक आणि अवेळी फोन करून ते अडचणीत आहे किंवा त्यांना ठराविक गोष्टींची मदत हवी असल्याचे सांगितले, तर आलेला फोनकॉल हा खोटा असण्याची शक्यता असते. फसवणूक करणारे नेहमी अशा गोष्टींचा आधार घेतात, त्यामुळे नेमके प्रकरण जाणून घ्या.

२. तातडीने पैश्यांची मदत असल्याचे सांगणे

अशावेळेस फोनवरून बोलणारी व्यक्ती ते अत्यंत अडचणीत असल्याचे किंवा त्यांना तातडीने मदत हवी असल्याचे भासवत. तुमच्याकडून ते पैश्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळेस आपण अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला विचार न करता मदत करून मोकळे होतो. मात्र, अवेळी अचानक आलेल्या फोनवरून जर कुणी अशी मदत मागत असेल तर सर्वप्रथम सर्व प्रकारची एकदा व्यवस्थित चौकशी करावी, खात्री करावी. परंतु, तुम्हाला यात काही गडबड वाटल्यास ताबडतोब त्यावर कारवाई करावी.

३. बोलण्याची पद्धत

AI आवाज क्लोनिंग करण्यात म्हणजे आवाजाची नक्कल करण्यात जरी तरबेज असेल तरी त्याच्याकडून अगदी लहान चुका होतात. त्या चुका शोधण्याच्या प्रयत्न करा. जसे की बोलण्याची पद्धत. प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर आलेल्या फोनवरची व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी किंवा विचित्र बोलत असेल तर सावध राहा. शब्द उच्चारतानासुद्धा AI चुकीचे किंवा काही शब्द विचित्र, रोबोटिक पद्धतीने उच्चारते. असे जाणवल्यास बनावट फोनकॉल असल्याचे समजावे.

४. वैयक्तिक माहिती मागणे

तुमच्या बँकेबद्दल, बँक कार्ड्सबद्दल किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीबद्दल फोनवरील व्यक्ती विचारात असेल तर त्यांना ती अजिबात देऊ नका. कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा स्वतः बँक तुम्हाला फोनवरून अशी माहिती विचारणार नाही. त्यामुळे कुणी अशी माहिती देण्यास सांगितले तर सतर्क राहावे.

हेही वाचा : विमानाचे तिकीट बुक करणे पडले महागात; बसला ४.४ लाखांचा फटका! नेमके प्रकरण जाणून घ्या….

यापासून सावधान कसे राहावे?

१. अनोळखी आणि अनपेक्षित नंबरवरून आलेले फोन घेऊ नका. तुमच्या जवळची व्यक्ती खरंच तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्यास ती तुम्हाला एखादा मेसेज करून जमेल तेव्हा फोन करण्यासाठी सांगेल.

२. ओळख पटवून घ्या.

अनोळखी नंबरवरून आलेला फोन जरी तुम्ही घेतलात, तरी समोरून कोण बोलत आहे याची खात्री पटवून घ्यावी. केवळ आवाजात साम्य आहे किंवा समोरच्याने सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. काही ठराविक प्रश्न विचारा, ज्याची उत्तरं केवळ त्या व्यक्तीला माहीत असतील.

३. ताण घेऊ नका.

फोनवरील व्यक्ती तुम्हाला सर्व गॊष्टी करण्यासाठी जर दबाव टाकत असेल किंवा तुम्हाला एकंदरीत परिस्थितीमध्ये तणाव जाणवत असेल तर सरळ, तुम्हाला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे सांगून नंतर फोन करण्यासाठी सांगा.

४. तक्रार करा

तुम्हाला जर आलेल्या फोनकॉलमध्ये गडबड जाणवली किंवा तुम्हाला आलेला फोनकॉल हा AI निर्मित आहे, असे लक्षात आल्यास ताबडतोब पोलिसांत तक्रार दाखल करा.

५. ऑनलाइन माहिती शेअर करताना काळजी घ्या.

तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असणारी माहिती वापरून, तुमची नक्कल करत स्कॅम केला जातो. त्यामुळे ऑनलाइन, सोशल मीडियावर आपण काय शेअर करतो आहे याकडे लक्ष ठेवा.

६. कॉल-ब्लॉकिंग ॲपचा वापर

अशा खोट्या नंबरवरून आलेले फोन ब्लॉक करण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही वापर करू शकता.

Story img Loader