आजच्या डिजिटलच्या जगात ऑफिस काम असो की इतर कोणतेही व्यवहार करणं असो, हे इंटरनेटशिवाय शक्य नाही. अशात जर तुमचं इंटरनेट काम करत नसेल तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा वेळी अनेक जण हाय स्पीड इंटरनेटसाठी वायफाय कनेक्शन लावतात पण अनेकदा वायफाय इंटरनेटही स्लो काम करतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का? तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळंही वाय फायचं स्पीड कमी होऊ शकतं. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

वाय फाय इंटरनेटचं स्पीड कमी का होतं?

वाय फाय इंटरनेटची स्पीड कमी होण्यामागे अनेक कारणं आहेत.
१. कदाचित इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्यांकडून तांत्रिक अडचणी असतील.
२. सर्व्हर ओव्हरलोड किंवा पावर आउटेजची समस्या असू शकते.
३.पण वरीलपैकी दोन्ही कारणं नसतील तर वाय फाय राउटरमध्ये समस्या असू शकतात.
४. अनेकदा राउटर कोणत्या ठिकाणी ठेवलाय, यावरही इंटरनेट स्पीड अवलंबून असतं.

हेही वाचा : अ‍ॅपलच्या iPhone 15 Pro Max आणि MacBook Air मध्ये दिसणार ‘हे’ खास फीचर्स

या गोष्टी लक्षात ठेवा

  • राउटर पॉइंटला कुठेही ठेवू नका. राउटर पॉइंट ठेवण्यासाठी सेंटर पॉइंट निवडा.
  • राउटरला नेहमी उंच ठिकाणी ठेवा. यामुळे इंटरनेट स्पीड चांगलं राहतं.
  • राउटरच्या आजूबाजूला अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका. राउटरच्या समोर कोणतीही मोठी वस्तू ठेवू नका, यामुळे स्पीड कमी होऊ शकते.
  • वाय फाय राउटर अँटिनासोबत येतो. त्यामुळे अँटिना योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने असणं गरजेचं आहे.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to increase wi fi speed of internet router your these mistakes make your wifi speed low ndj