Google ने अलीकडेच त्यांच्या वर्षातील सर्वात मोठा असणाऱ्या Google I/O इव्हेंटमध्ये Wear OS 4 ची घोषणा केली आहे. Wear OS हे जगभरामध्ये सर्वात वेगाने वाढणारे स्मार्टवॉचचे प्लॅटफॉर्म आहे. गुगलने वॉच ओएसवर WhatsApp विकसित करण्यासाठी मूळ कंपनी असणाऱ्या Meta कंपनीसह भागीदारी केली आहे. लवकरच WhatsApp हे Galaxy Watch 4 आणि Watch 5 सिरीजमधील स्मार्टवॉचसाठी उपलब्ध होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Galaxy Watch 4 आणि Galaxy Watch 5 साठी Wear OS 4 वर कस्टम OneUI Watch 5 स्किनसह उपलब्ध आहे. नवीन अपडेटमध्ये ओएसच्या ननवीन सिरीजमध्ये सर्व फीचर्स आणि क्षमतांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा : Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…, जाणून घ्या महिन्याला किती येणार खर्च?

वर्षाच्या अखेरीस याचे स्टेबल व्हर्जन अधिकृत होण्याची अपेक्षा आहे. Wear OS साठी WhatsApp चे बीटा व्हर्जन आधीपासूनच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ज्या वापरकर्त्यांकडे गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp बीटा आहे ते आपल्या स्मार्टवॉचवर डाउनलोड करू शकतात.

Wear OS स्मार्टवॉचवर WhatsApp कसे इंस्टॉल करायचे ?

१. सर्वात पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन whatsapp सर्च करावे.

२. तिथे तुम्हाला एक ‘available on more devices’ असा पर्याय दिसेल.

३. त्यानंतर इंस्टॉल बटणावर क्लिक करा. जे तुमच्या स्मार्टवॉचवर WhatsApp ऑटोमेटिक डाउनलोड होईल.

४. जर का तुमच्या स्मार्टवॉचमध्ये इंटरनेट कनेक्शन असेल तर त्यावर तुम्हाला आलेले मेसेज कळू शकतात. तसेच तुम्ही वॉचमधूनच थेट त्या मेसेजला रिप्लाय देखील करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to install download whatsapp on wear os smartwatch google io event 2023 tmb 01