iPhone GIF Maker Tricks: गेल्या काही वर्षांमध्ये अॅप्पल कंपनीच्या आयफोनच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या देशातही आयफोन वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या प्रीमियम फोन्सना अॅप्पलचा आयफोन टक्कर देत असतो. स्पेशल फीचर्ससह आयफोनच्या लूकसाठीही लोक याची खरेदी करत असतात. आयफोनचा कॅमेरा देखील चांगल्या दर्जाचा असतो. यामध्ये काढलेले फोटो, व्हिडीओ एखाद्या डीएसएलआर कॅमेऱ्यामधून काढलेल्या फोटोंसारखे असतात. चित्रपटनिर्मितीसाठीही आयफोनच्या कॅमेऱ्याचा वापर केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया अॅप्सवर GIF चा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे. संभाषणादरम्यान लोक एकमेकांना GIF पाठवत असतात. काही ठिकाणी तर GIF कमेंट देखील करता येतात. आयफोन यूजर्स देखील GIF चा वापर चॅटींग करण्यासाठी करत असतात. पण GIF बनवण्यासाठी काहीजण Third Party Apps किंवा Websites ची मदत घेत असतात. त्यांना आयफोनमध्ये GIF कसे बनवायचे हे ठाऊक नसते. आयफोनमध्ये व्हिडीओ, फोटोचे GIF बनवण्यासाठी आयफोनमध्ये इनबिल्ड असलेल्या ‘Shortcuts’ अॅपची मदत घेता येते. जर एखाद्या आयफोनमध्ये हे अॅप उपलब्ध नसेल, तर यूजर App Store मधून ते डाउनलोड करु शकतात.
आयफोनमध्ये GIF बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्यात.
- आयफोनमधील ‘Shortcuts’ अॅप उघडा. iCloud लिंकवर क्लिक करुन अॅप्पलच्या ‘Make GIF’ shortcut चा अॅक्सेस मिळवा.
- त्यानंतर ‘Get Shortcut’ वर क्लिक करा, पुढे स्क्रीनच्या खालच्या बाजूला असलेल्या ‘Add shortcut’ बटण सिलेक्ट करा.
- ‘Shortcuts’ वर जाऊन ‘My Shortcuts’ ऑप्शनवर क्लिक करा. याने ‘Make GIF’ ऑप्शनचा अॅक्सेस मिळेल.
- GIF बनवण्यासाठी फोटो किंवा शॉर्ट व्हिडीओ फोटो गॅलरीमधून निवडा. (जास्त लांबीचा व्हिडीओ असल्यास तो ट्रिम करा.)
- GIF तयार केल्यानंतर ‘Save’ बटणावर क्लिक करा. सेव्ह केलेला GIF गॅलरी किंवा फोटो अॅपमध्ये मिळेल.
‘Make GIF’ ही सुविधा iPhone, iPad आणि Mac यांमध्ये उपलब्ध आहे. shortcut अॅड करुन यूजर्स Siri च्या मदतीने सुद्धा GIF तयार करु शकतात.