भारतात सध्या डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिक कॅश पेमेंटपेक्षा डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यावर अधिक भर देत आहेत. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही देशातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. हे वापरकर्त्यांना जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंट करू देते. देशांतर्गत वापरासाठी सुरू करण्यात आलेली ही पेमेंट पद्धत लोकांच्या पसंतीची बनली आहे. तसेच आता परदेशामध्ये देखील ही उपलब्ध करण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

परदेशात असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी व्यवहार सुलभ करण्यासाठी भारत सरकारने फ्रान्स आणि UAE सह अनेक आंतरराष्ट्रीय देशांमध्ये UPI पेमेंट उपलब्ध करून दिले आहे. हे अनिवासी भारतीयांसाठी (NRIs) आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू करणे देखील सुलभ आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी

हेही वाचा : लवकरच बाजारात येणार iPhone 15; कधी होणार लॉन्च? काय आहे किंमत? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतात लोकप्रिय असणारी UPI पेमेंट सेवा सध्या फ्रान्स, भूतान,नेपाळ, ओमान, UAE, मलेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, कंबोडिया, हॉंगकॉंग, तैवान, साऊथ कोरिया आणि जपान , इंग्लंड व युरोप या देशांमध्ये उपलब्ध आहे.

त्यामुळे तुम्ही UPI पेमेंट सेवा उपलब्ध असलेल्या देशांमधील एका देशात प्रवास करत असाल तर तुम्ही व्यवहार करण्यासाठी PhonePe, Amazon Pay, Google Pay, Paytm आणि इतर सारख्या UPI पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू शकता. हे अॅप्स तुम्हाला तुमचे UPI आयडी किंवा लिंक केलेला बँक अकाउंट नंबर वापरून डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम बनवतात.

हेही वाचा : Tech Tips: भारतात पासवर्ड शेअरिंग बंद, आता Netflix हाऊसहोल्ड अकाउंट कसे सेट करायचे? जाणून घ्या…

इतर देशांमध्ये UPI Apps कसे वापरायचे ?

१. सर्वात पर्थ तुम्ही तुमचे UPI सक्षम मोबाईल अ‍ॅप जसे की फोन पे, गुगल पे , पेटीएम यासारखे Apps डाउनलोड करावे किंवा ओपन करावे. जे तरराष्ट्रीय UPI व्यवहारांना अनुमती देते.

२. अ‍ॅमध्ये तुमचे भारतीय बँक अकाउंट रजिस्टर करावे.

३. एकदा का तुमचे बँक अकाउंट लिंक झाले की, तुम्हाला प्राप्तकर्त्याचे बँक अकाउंट नंबर, IBAN आणि BIC, ट्रान्सफर रक्कम आणि चलनासह अन्य डिटेल्स प्रदान करणे आवश्यक आहे.

४. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज प्राप्त होईल.

विशेष म्हणजे, तुमच्या व्यवहारांवर कन्व्हर्जन चार्जेस, फॉरेन एक्सचेंज फी आणि अन्य शुल्क लागू होईल. तसेच युपीआय पेमेंट सेवा हळूहळू परदेशात आणली जात आहे. त्यामुळे ही सेवा यादीतील सर्वच देशांमध्ये उपलब्ध असेलच असे नाही.

Story img Loader