भारतात व्हॉट्सअॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतेच असते. कारण जलद मॅसेज पाठवण्यासोबत संवाद साधण्याचं उत्तम अॅप म्हणून याकडे पाहिलं जातं. लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होमच्या काळात व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर झाला आणि होत आहे. मोबाईल अॅप लॅपटॉप डेस्कटॉपला लिंक करत काम केलं जात आहे. व्हॉट्सअॅप युजर्सची मागणी पाहता अनेक फिचर्स आणत असते. आताही मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन वैशिष्ट्ये आणलं आहे. जर तुम्ही व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट्स डाऊनलोड केले तर तुम्हाला हे फिचर्स वापरता येतील. आता आपण आपला फोटो व्हाट्सअॅप स्टिकरमध्ये टाकू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वप्रथम तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर WhatsApp वेब उघडा आणि नंतर चॅट विंडोवर क्लिक करा. चॅट विंडोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंट पर्यायावर जावे लागेल आणि येथे स्टिकर पर्यायावर क्लिक करावे लागेल. यातुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमधून तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टिकर बनवायचा आहे तो फोटो निवडा. फोटो निवडल्यानंतर त्याच्या सभोवतालचे कोपरे समायोजित करा आणि नंतर ग्रीन अॅरो आयकॉनवर टॅप करा. यानंतर तुमचा फोटो व्हॉट्सअॅप स्टिकरच्या रूपात जाईल.
Jio होळी धमाका! रोज २.५ जीबीपर्यंत डेटा देणारे प्लान लाँच, जाणून घ्या
दुसरीकडे, व्हॉट्सअॅप अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी नवीन ‘सर्च मेसेज’ शॉर्टकट पर्यायाची चाचणी करत आहे. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटनंतर कॉन्टॅक्ट पेज आणि ग्रुप इन्फो पेजमध्येही बदल दिसतील. अँड्रॉइड आणि वेब बीटा आवृत्त्यांसाठी उपलब्ध, हे वैशिष्ट्य युजर्संना त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट कोण पाहू शकेल हे निवडण्याची परवानगी देईल.