इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्रामचे जगभरात लाखो युजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवरून फोटो, रील्स, व्हिडीओ असा कंटेन्ट शेअर करता येतो. युजर्सना आकर्षित करण्यासाठी इन्स्टाग्रामकडून सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. आजकाल लहान मुलांचे देखील इन्स्टाग्राम अकाउंट असते. पण काय योग्य काय अयोग्य याची जाण नसलेल्या लहान मुलांना अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे काही चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी पालक चिंतेत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालक आता यापासून चिंतामुक्त होऊ शकतात. कारण लहान मुलांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवार लक्ष ठेवणे खूप सोपे झाले आहे. ‘पॅरेनटल सुपरवीजन’ या इन्स्टाग्राम फीचरचा वापर करून मुलांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी पालक आणि पाल्य अशा दोन्ही फोनमधून अनुमती असणे आवश्यक असणार आहे. जर सुपरविजन काढुन टाकण्यात आले तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचे नोटीफीकेशन लगेच पाठवले जाईल. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

आणखी वाचा : आता WhatsApp ग्रुप चॅटवर दिसणार डीपी, काय आहे नवे फीचर जाणून घ्या

या स्टेप्स वापरून इन्स्टाग्रामवर करा पॅरेंटल सुपरविजन

  • इन्स्टाग्राम ॲप उघडून त्यात सेटींग्स पर्याय उघडा.
  • तिथे तुम्हाला सुपरविजनचा पर्याय दिसेल. त्यामध्ये फॅमिली सेंटर पर्यायावर क्लिक करा.
  • आता क्रिएट इनव्हाईट पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामधील लिंक कॉपी करून तुमच्या मुलाला किंवा मुलीला पाठवा.

अशाप्रकारे इन्व्हिटेशन पाठवल्या नंतर मुलांच्या फोनमधून ते ऍक्सेप्ट करणे गरजेचे आहे. या पद्धतीचा वापर करून मुलांना संभाव्य धोक्यापासून वाचवण्यात पालकांना मदत मिळेल.