व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ चॅटिंगसाठीच नव्हे तर त्याचा ऑफिसच्या कामासाठी देखील वापर होत आहे. ग्रुप्स बनवून लोक, कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात राहात आहेत. त्यातून नवीन अपडेट्स मिळताहेत. नवनवे व्हिडिओ पोस्ट करून आपले कला कौशल्य स्टेटसद्वारे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे, हे चॅटिंग अ‍ॅप आता आयुष्याचा महत्वाचा भाग होऊन बसला आहे. मात्र, सततच्या नोटिफिकेशन्समुळे हे अ‍ॅप डोकेदुखी देखील होऊन जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही न आवडत्या लोकांचे मॅसेज किंवा ग्रुपवर येणारे मॅसेज ते वाचण्याची इच्छा नसतानाही सतत स्क्रिनवर पडतात. त्यांच्यापासून सुटका मिळण्यासाठी एक उपाय आहे. कुठलेही ग्रुप न सोडता किंवा कोणताही नंबर ब्लॉक न करता तुम्ही न आवडणाऱ्या मेसेजेसपासून स्वत: ला दूर ठेवू शकता. अनावश्यक मेसेज तुम्ही म्युट करू शकता.

(Twitter Edit : ट्विटरच्या एडिट फीचरवर असणार मर्यादा; केवळ इतक्या वेळा एडिट करता येणार)

  • सर्वात आधी तुम्ही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या किंवा ग्रुपमधील मेसेजेसच्या नोटिफिकेशन नकोत त्यावर तुम्ही लाँग प्रेस करा.
  • व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या नावावर लाँग प्रेस केल्यावर एक पर्याय स्क्रिनवर येईल. यात किती कालावधीसाठी नोटिफिकेशन म्युट करायचे आहे, याबाबत पर्याय देण्यात आले आहे.
  • ८ तास, एक आठवडा, त्याचबरोबर महिन्याभरासाठी तुम्ही न आवडते नोटिफिकेशन्स म्युट करू शकता. या पैकी कुठलाही एक पर्याय निवडा.
  • वरील तीन पर्यायांपैकी एक निवडल्यास नोटिफिकेशन्स म्युट होतील. तुम्हाला न आवडणारे मेसेजेस तुम्हाला त्रास देणार नाहीत. मात्र, किती काळ ते म्युट राहतील ते तुम्ही कुठले पर्याय निवडले आहे त्यावर अवलंबून आहे.

म्युट करण्याचे फायदे

म्युट केल्याने अनावश्यक मॅसेजेसचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाहीत. त्यामुळे तुम्हालाही त्रास होणार नाही. जेव्हा तुम्हाला बघायचे असेल तेव्हा तुम्ही ते चॅट बघू शकता. इतर मेसेजेस तुम्हाला येत राहतील.

(Apple Watch : अ‍ॅपल वॉच अल्ट्रा महाग, पण ‘हे’ दमदार फीचर्स एकदा विचार करायला भाग पाडतील)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to mute unwanted notifications in whatsapp ssb