तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसेल, तर ते लवकरच भरा. कारण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. प्रत्येक वर्षातील हा काळ असा असतो की जेव्हा सर्व करदाते आपले आयटीआर रिटर्न्स (ITR) भरण्यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे आणि पैशांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त असतात. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. ३१ जुलैच्या पुढे ही मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. टॅक्स भरण्यासाठी भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी Phone Pe ने त्यांच्या App वर ‘Income Tax Payment’ हे फिचर लॉन्च केले आहे. आपण फोन पे वरून इन्कम टॅक्स कसा भरायचा व त्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत ते जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोन पे ने लॉन्च केलेले हे फिचर करदात्यांना आणि व्यावसायिकांना थेट फोन पे मधून self-assessment आणि अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरता येणार आहे. फोन पे ने सांगितल्याप्रमाणे या फीचरमुळे करदात्यांना सोपे होणार आहे. यामुळे टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज निर्माण होणार नाही. हे फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे ने PayMate, डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता सह भागीदारी केली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Income Tax: Phone Pe च्या मदतीने भरता येणार इन्कम टॅक्स, लॉन्च केले ‘हे’ फिचर

PhonePe वर इन्कम टॅक्स कसा भरायचा ?

१. सर्वात पहिल्यांदा तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइड फोनमध्ये फोन पे App ओपन करावे.

२. फोन पे च्या होम पेजवर ‘इन्कम टॅक्स’ सर्च शोध आणि त्यावर क्लिक करा.

३ . त्यानंतर तुम्हाला कोणता टॅक्स भरायचा आहे तो प्रकार निवडावा. त्यामध्ये मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्ड डिटेल्स जोडा.

हेही वाचा : IRCTC Down: आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प; हजारो प्रवाशांना फटका

४. तुमच्या टॅक्सची रक्कम त्यामध्ये भरावी. तसेच पेमेंट मोड निवडावा.

५. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर दोन कार्यालयीन दिवसांमध्ये टॅक्सची रकम पोर्टलवर जमा केली जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to pay income tax on phone app launch tax payment feature check details tmb 01