उन्हाळा म्हटलं की बाहेरून आल्यावर फ्रिजमधील थंडगार पाण्याची बाटली काढून पंखा, एसी किंवा कूलर लावून त्याच्या समोर जाऊन बसणे. या ऋतूत घर थंडगार असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठीच अनेक जण घरात एसी, कूलर लावून घेतात. पण, एसी खरेदी करण्यापूर्वी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सध्या बाजारात अनेक एसी उपलब्ध असून नेमका कोणता एसी खरेदी करायचा असा प्रश्न अनेकांना पडतो; तर आज आपण या लेखातून एसीचे प्रकार, कोणता एसी वीज आणि पैसे बचत करतो ते जाणून घेऊ.
एसीचे दोन प्रकार आहेत विंडो एसी आणि स्प्लिट एसी (Window ACs and Split ACs) –
स्प्लिट एसीच्या तुलनेत विंडो एसी सहसा स्वस्त असतात आणि हा एसी घरात बसवणे देखील सोपे जाते. तसेच स्प्लिट एसी कमी आवाजासह अधिक कूलिंग देतात. स्प्लिट एसी वापरण्यास खूप सोप्पा असतो. प्रामुख्याने स्प्लिट एसी दोन प्रकारांमध्येदेखील ओळखले जाऊ शकतात, पारंपरिक किंवा नॉन-इनव्हर्टर स्प्लिट एसी (conventional or non-inverter). इन्व्हर्टर स्प्लिट एसी थंड आणि वीज बचतसाठी अधिक कार्यक्षम ठरतो.
हेही वाचा…तुम्ही कधी नोकरी सोडणार हे आता बॉसला कळणार? AI करणार तुमची पोलखोल, असा होणार ‘या’ नवीन टूलचा वापर
एसीची कूलिंग क्षमता –
- ०.८ टन १०० स्क्वेअर फूटपर्यंत २५,००० रूपये.
- १ टन १२५ स्क्वेअर फूटपर्यंत २८,००० रुपये.
- १.५ टन २५० स्क्वेअर फूटपर्यंत ३५,००० रुपये.
- २ टन ४०० स्क्वेअर फूटपर्यंत ४०,००० रुपये.
तर वरील तक्त्याप्रमाणे मॉडर्न एसी चार वेगवेगळ्या आकारात (कूलिंग क्षमतेच्या दृष्टीने) उपलब्ध आहेत. एंट्री-लेव्हल एसीमध्ये ०.८ टन कूलिंग क्षमता, तर अधिक महाग एसीमध्ये २ टनपर्यंत कूलिंग क्षमता असते. १.५ टन एसी १ टन एसीपेक्षा खूप लवकर खोली थंड करू शकतो. त्याचप्रमाणे २ टन एसी अधिक जास्त वेगाने खोली थंड करू शकतो.
वीज बचत –
बीईई स्टार | रेटिंग | (Min) |
१ स्टार | २.७ | ३.०९ |
२ स्टार | ३.१ | ३.३९ |
३ स्टार | ३.४ | ३.६९ |
४ स्टार | ३.७ | ३.९९ |
५ स्टार | ४.० |
वीज वापर –
एसीच्या वीज वापराची गणना वापरकर्त्यांच्या सोयीनुसार बदलते आणि खोलीचे तापमान, ऑपरेशनल Hours, आवश्यक तापमान, वीज दर आदी बऱ्याच पॅरामीटर्सवर अवलंबून असते. रात्रीच्या तुलनेत एसी दिवसा जास्त वापरला जातो. रात्रीच्या वातावरणाच्या तापमानात उकाडा थोडा कमी असल्यामुळे एसीने जास्त कूलिंग देणं गरजेचं नसते. सहसा ज्या एसींना जास्त रेटिंग असते, त्यांची किंमतही जास्त असते. पण, ते कमी वीज वापरतात. जितके अधिक स्टार्स, वीज वापर तितकाच कमी.
कोणता एसी विकत घेणं बेस्ट ठरेल?
आज, भारतात एसी ऑफर करणारे बरेच ब्रँड आहेत आणि काही लोकप्रिय नावांमध्ये सॅमसंग, एलजी, लॉईड इत्यादींचा समावेश आहे. बहुतेक स्प्लिट एसी एअर फिल्टरिंगसारख्या क्षमतेसह व स्मार्ट फीचर्ससह उपलब्ध असतात, त्यामुळे असा एसी निवडावा जो आपल्याला उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात हिट फीचर प्रदान करेल.तर दुकानात गेल्यावर वरील सर्व गोष्टी पाहूनच तुम्ही एसी खरेदी करा.